Priyanka -Nick : निक-प्रियांकाचे रोमँटिक अंदाजात बर्थ डे सेलिब्रेशन

Priyanka -Nick
Priyanka -Nick

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकताच आपला वाढदिवस उत्साहात साजरा केला. प्रियांकाचा पती आणि प्रसिद्ध अमेरिकन पॉप गायक निक जोनासने आपल्या लाडक्या पत्नीचा वाढदिवस खास बनवला. यावेळी निकने प्रियांकाला (Priyanka -Nick ) शुभेच्छा देताना एक लिपलॉक करतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर चाहत्यांसह बॉलिवूड स्टार्संनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.

वाढदिवसानिमित्त गायक निक जोनासने त्याच्या इंन्स्टाग्रामवर पत्नी प्रियांकासोबतचा (Priyanka -Nick ) एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत प्रियांका पिवळ्या रंगाच्या टॉप आणि स्कर्टमध्ये तर निक ब्लॅक रंगाच्या टी शर्टमध्ये दिसतोय. या फोटोतील खास म्हणजे, निकने प्रियांकाच्या वाढदिवशी शुभेच्छा देत लिपलॉक केले आहे. यावेळी दोघेजण कपल रोमॉटिक मूडमध्ये समुद्राच्या काठावर दिसतात.

या फोटो शेअर करताना निकने 'जुलै महिन्यात जन्मलेल्या माझ्या लाडक्या पत्नीला वाढदिवसाच्या खूपच शुभेच्छा. आयुष्यातील चढउतार प्रवासात तुझी साथ मिळाल्याने मी स्वतःला भाग्यशाली मानतो. आय लव्ह यू.' असे म्हटलं आहे. यासोबत निकने प्रियांकाला टॅगदेखील केलं आहे. यातील आणखी एका फोटोत हे कपल रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेले असल्याचे दिसतेय. दुसऱ्या फोटोत निकने प्रियांकाच्या नावाचे पोस्टर हातात घेतल्याचे दिसतेय.

या सगळ्यावरून निकने प्रियांकाचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केल्याचे दिसतेय. हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी प्रियांकाला भरभरून शुभेच्छा देत कॉमेन्टस केल्या आहेत. आतापर्यत चाहत्यांनी या फोटोला १ लाखांच्या जवळपास लाईक्स केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nick Jonas (@nickjonas)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nick Jonas (@nickjonas)

पाहा सई ताम्हणकरचे खास फोटो

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news