Most Googled Bollywood Star: गुगलवर सर्वाधिक सर्च होणारी बॉलिवूड स्टार कोण? आलिया, प्रियंका आणि दीपिकालाही टाकलं मागे

Most Googled Bollywood Star: FIFA World Cup 2026 मधील दमदार परफॉर्मन्सनंतर नोरा फतेहीची लोकप्रियता शिगेला
Most Googled Bollywood Star
Most Googled Bollywood StarPudhari
Published on
Updated on

Most Googled Bollywood Star: बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री त्यांच्या अभिनयामुळे चर्चेत असतात, तर काही आपल्या ग्लॅमर आणि डान्समुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. मात्र यावेळी लोकप्रियतेच्या बाबतीत नोरा फतेहीने मोठी झेप घेतली आहे. जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिन असलेल्या Google वर सर्वाधिक सर्च केली जाणारी बॉलिवूड स्टार म्हणून नोरा फतेहीचे नाव समोर आले आहे. विशेष म्हणजे तिने आलिया भट्ट, प्रियंका चोप्रा आणि दीपिका पदुकोणसारख्या आघाडीच्या अभिनेत्रींनाही लोकप्रियतेत मागे टाकले आहे.

फिफा वर्ल्ड कप 2026 च्या उद्घाटन सोहळ्यात नोरा फतेहीने दिलेल्या दमदार परफॉर्मन्सनंतर तिची लोकप्रियता प्रचंड वाढल्याचे दिसून आले. 12 जून रोजी झालेल्या या भव्य सोहळ्यात नोऱाने आपल्या जबरदस्त डान्स आणि स्टेज प्रेझेन्सने जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर तिचे व्हिडिओ, फोटो आणि परफॉर्मन्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

Google Trends च्या आकडेवारीनुसार, गेल्या काही दिवसांत जगभरातील इंटरनेट युजर्सनी नोरा फतेहीबद्दल सर्वाधिक शोध घेतला. तिच्या गाण्यांपासून ते चित्रपटांपर्यंत आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात Google वर सर्च केल्याचे दिसून आले. यामुळे ती सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींपैकी एक बनली आहे.

नोऱाची लोकप्रियता केवळ भारतापुरती मर्यादित राहिलेली नाही. मध्यपूर्व, युरोप आणि इतर अनेक देशांमध्येही तिचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. तिच्या डान्सिंग स्टाइलने आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमधील सहभागामुळे तिला जागतिक ओळख मिळाली आहे.

Most Googled Bollywood Star
Milk Price Hike: महागाईचा झटका! ‘अल निनो’मुळे दूध पुन्हा महागणार? अमूल-मदर डेअरीने दिले मोठे संकेत

या यशानंतर नोरा फतेहीने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्टही शेअर केली. या खास क्षणाचा आनंद व्यक्त करताना तिने चाहत्यांचे आभार मानले. इतक्या मोठ्या मंचावर डान्स करण्याची संधी मिळाल्याबद्दल आणि कुटुंबीय व जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत हा क्षण अनुभवता आल्याबद्दल तिने आनंद व्यक्त केला.

फिफा वर्ल्ड कपसारख्या जागतिक व्यासपीठावर झळकल्यानंतर नोरा फतेहीची लोकप्रियता आणखी वाढली असून, Google वर सर्वाधिक सर्च होणारी बॉलिवूड स्टार बनण्याचा मान तिने पटकावला आहे. त्यामुळे आगामी काळात तिच्या करिअरमध्ये आणखी मोठे प्रोजेक्ट्स आणि आंतरराष्ट्रीय संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news