Tarak Mehta : नवे ‘तारक मेहता’ सचिन श्रॉफ यांना पाहून ट्विटरवर मीम्सचा पूर

सचिन श्रॉफ-शैलेश लोढा
सचिन श्रॉफ-शैलेश लोढा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : तारक मेहता का उल्टा चश्मा लोकप्रिय टीव्ही मालिका आहे. या शोमध्ये आतापर्यंत अनेक कलाकार आले आणि गेले. आता या मालिकेत सचिन श्रॉफ यांनी नवे तारक मेहता बनून एंट्री घेतली आहे. या मालिकेचा एपिसोड टेलीकास्ट झाला. पण, प्रेक्षक वर्गावा नवे तारक मेहताचा अभिनय फारसा रुचलेला नाही.

तारक मेहताच्या उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) कोणत्या ना कोणत्या कारणांनी हेडलाईन्समध्ये राहतो. यावेळी ही मालिका नवीन तारक मेहता म्हणजेच सचिन श्रॉफबद्दल चर्चेत आलीय. तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये शैलेश लोढा यांची बदली होणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर सचिन श्रॉफ यांची गोकुळधाममध्ये एन्ट्री झाली. पण चाहत्यांना सचिन श्रॉफ तारक मेहताच्या रुपात कदाचित आवडलेला दिसत नाही. (Tarak Mehta)

मीम्सचा पूर

तारक मेहता का उल्टा चष्माचे चाहतेही सोशल मीडियावरखुलेपणाने मत मांडत आहेत. शैलेश लोढा ऐवजी सचिन श्रॉफला पाहून लोकांनी इंटरनेटवर आपल्या मनातील गोष्ट बोलायला सुरुवात केली आहे.

चाहत्यांना आठवला जुना तारक मेहता-

नवीन तारक मेहता (सचिन श्रॉफ) ला स्वीकारणे लोकांना किती कठीण आहे हे ट्विट वाचल्यानंतर लक्षात येते.

तारक मेहतामधील एन्ट्रीबद्दल बोलताना सचिन श्रॉफ म्हणा की, तारक मेहता का उल्टा चष्मा हा सर्वात जास्त आवडलेला टीव्ही शो आहे. तारक मेहताची भूमिका दिल्याबद्दल सचिनने शोचे निर्माते असित मोदी यांचे आभार मानले आहेत. सचिनने सांगितले की, शोच्या संपूर्ण स्टारकास्टने त्याचे अतिशय भव्य पद्धतीने स्वागत केले. संघासोबत काम करण्याचा चांगला अनुभव असल्याचेही त्याने सांगितले. यामध्ये तारक मेहताच्या भूमिकेला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असेल. सचिन श्रॉफने त्याच्या व्यक्तिरेखेला न्याय देणार असल्याचं म्हटलं आहे, मात्र चाहत्यांच्या प्रतिक्रिया पहिल्या एपिसोडनंतर समोर येत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news