

मुंबई - कमळी ही नवी मालिका तुमच्या भेटीला येत आहे. ‘कमळी’ ही अशाच एका मुलीची गोष्ट आहे, जिला माहितीये की ‘शिक्षण हाच उद्धाराचा आणि स्वाभिमानाचा मार्ग आहे’. त्यामुळेच लहानशा खेड्यातून बाहेर पडून तिला मुंबईत यायचंय आणि सगळ्यात नावाजलेल्या महाविद्यालयात शिक्षण घेऊन मोठं व्हायचंय.
आपल्या शिक्षणाचा उपयोग करुन तिला गावी महाविद्यालय उघडायचंय, जिथे तिच्यासारख्याच शिक्षणाची ओढ असणाऱ्या अनेक मुली शिकू शकतील. कमळीचा संघर्ष सुरु होतो जेव्हा तिला स्वप्नांची महानगरी मुंबईच्या महाविद्यालयात स्कॉलरशिपद्वारा ॲडमिशन मिळते. मुंबईत शिक्षणासाठी आलेली कमळी सामाजिक भेदभावाचा सामना करताना आणि त्यांच्याशी लढताना दिसणार आहे. तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असणार आहे.
कमळी महाराष्ट्रातील असंख्य कुटुंबांची कथा आहे. जिथे मुलींची स्वप्नं अद्याप अपूर्ण आहेत. कमळी ही त्या मुलीची कथा आहे जी शिकू इच्छिते, मोठं होऊ इच्छिते आणि आपल्या कुटुंबाला अभिमान वाटावा, असं काहीतरी करु इच्छिते. 'कमळी' ३० जूनपासून दररोज रात्री ९ वा. झी मराठीवर पाहा.
video-Zee Marathi Instagram वरून साभार