Gautami Patil Sundara Teaser | गौतमीचं ठसकेबाज नृत्य अन् निकची हुकस्टेप, “सुंदरा” गाण्याचा टीझर

Sundara Teaser | गौतमी पाटील आणि निक शिंदे “सुंदरा” गाण्यात पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत
image of Gautami Patil -Nick Shinde
Gautami Patil Sundara Teaser out now Instagram
Published on
Updated on

Gautami Patil Nick Shinde Sundara Teaser out

मुंबई - गौतमी पाटीलच्या कृष्ण मुरारी गाण्याच्या यशानंतर साईरत्न एंटरटेनमेंट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक रोमॅंटिक गाणं “सुंदरा”. नुकताच या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरची माहिती नृत्यांगना गौतमी पाटील आणि अभिनेता निक शिंदे याने सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

image of Gautami Patil -Nick Shinde
Sitaare Zameen Par Screening: जेनेलिया, असा नवरा मिळावा यासाठी काय केलंस?, रितेशच्या एका कृतीवर नेटिझन्स फिदा

रूपवान देखणी, जणू ती स्वर्गाची अप्सरा, मराठमोळा साजशृंगार करी, जणू ती स्वप्नातील “सुंदरा” असे कॅप्शन देत त्याने २ दिवसापूर्वी पोस्ट शेयर केली होती. त्यानंतर या गाण्यात निकसोबत गौतमी असणार आहे. हे स्वतः गौतमीने सोशल मीडियावर सांगितले होते. टीझर पाहता गाण जबराट असणार आहे यात काही शंका नाही.

image of Gautami Patil -Nick Shinde
Shubh vivah Chinmay Udgirkar | शुभविवाह मालिकेत चिन्मय उद्गिरकरची होणार एन्ट्री

साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत “सुंदरा” गाण्याचे निर्माते संदेश गाडेकर आणि सुरेश गाडेकर हे आहेत. नृत्यांगना गौतमी पाटील आणि अभिनेता निक शिंदे यांची फ्रेश जोडी या गाण्यात झळकणार आहे. गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनवणे यांनी हे गाणं गायलं असून वैभव देशमुख यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. विजय बुटे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार रोहित नागभिडे यांनी संगीत दिलं आहे. रोहित नागभिडे यांनी ख्वाडा, टीडीएम, लगन अश्या अनेक चित्रपटांना संगीत दिले आहे. संगीत नियोजन सिद्धांत बोरावके याने केले आहे. हे गाणं २३ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news