

कार्तिक आर्यन आणि आनन्या पांडे यांच्या TMMTMTTM चित्रपटातील ‘सात समुंदर पार’ या लोकप्रिय गाण्याचा रिमेक सोशल मीडियावर वादाचा विषय ठरत आहे. गाणं रिलीज होताच नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत “ओरिजिनलची भावना हरवली” आणि “हा खराब रिमेक आहे” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. या ट्रोलिंगमुळे चित्रपट आणि गाण्याबाबतची चर्चा अधिकच वाढली आहे.
TMMTMTTM Saat Samundar Paar song Kartik Aaryan-Ananya Panday
बॉलिवूडमध्ये जुन्या हिट गाण्यांचे रिमेक करण्याचा ट्रेंड काही नवीन नाही. मात्र, प्रत्येक वेळी प्रेक्षकांना, संगीतप्रेमींना ही कल्पना आवडेलचं असे नाही. आता कार्तिक आर्यन-अनन्या पांडे यांच्या आगामी चित्रपट TMMTMTTM मधील ‘सात समुंदर पार’ या सुपरहिट गाण्याचा रिमेक नुकताच रिलीज झाला आहे. पण या गाण्यावर नेटकऱ्यांकडून टीकेचा भडीमार सुरु आहे. नेटकरी, सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या.
१९९० च्या दशकातील हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. काहींनी तर बालपणीतले आवडते गाणे म्हणून प्रशंसा केलीय. त्यामुळे या गाण्याच्या रिमेककडून चाहत्यांच्या अपेक्षा प्रचंड होत्या. मात्र, गाणं रिलीज झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी निराशा व्यक्त केली. एक्स, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर Bad Remake,, “ओरिजिनलची जादू गायब, नॉस्टॅल्जिया खराब केला अशा कॉमेंट्स पाहायला मिळत आहेत.
कार्तिक आर्यन - अनन्या पांडे चा आगामी चित्रपट "तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी" या आगामी चित्रपटातील "सात समंदर पार २.०" हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. पण, हे गाणे पाहिल्यानंतर आणि ऐकल्यानंतर नेटकऱ्यांना राग आला आहे. "सात समंदर पार २.०" गाण्यात कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांच्यातील रोमँटिक केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे. शिवाय कोरिओग्राफीदेखील नेटकऱ्यांना फारशी आवडलेली नाही.
बॉलिवूड दीवा दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीवर हे ओरिजनल गाणे चित्रीत करम्यात आले होते. हे गाणे इतके प्रसिद्ध झाले की, ते एव्हरग्रीन ठरले. पण आता "सात समंदर पार" या गाण्याच्या रिक्रिएशनमुळे संताप व्यक्त होत आहे. त्यानंतर, "तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी" चित्रपट चर्चेत आला आहे.
कार्तिक आणि अनन्या ट्रोल
"तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी" मधील "सात समंदर पार" हे गाणे खूपचं संथ आणि न भावणारे आहे. कार्तिक आर्यनचा डान्सची कोरिओग्राफी देखील नेटकऱ्यांना फारशी आवडलेली नाही. पण नव्या लूकमध्ये शूट करण्यात आलेले गाणे त्यांना फारसे आवडलेले दिसत नाही. सात समंदर पार या नवीन गाण्याचे गायक करण ननवाणी आहेत. संगीतदेखील त्यांचे आहे. सात समंदर पार २.० मध्ये सनी देओलच्या विश्वात्मा चित्रपटाचे गीतकार आनंद बक्षी यांनी लिहिलेल्या सात समंदर या गाण्याच्या बोलांमध्ये करण ननवाणी यांनी काही बदल केले आहेत.
एका "नवीन 'सात समंदर पार' प्रत्यक्षात 'दुःखी समंदर पार' आहे. बालपणीच्या एका आयकॉनिक गाण्याचा किती अपव्यय..."
आणखी एका नेटकऱ्याने म्हटले "जो कोणी 'सात समंदर पार' गाणे रिमेक करेल त्याला मी शाप देईन."
दुसऱ्या नेटकऱ्याने पंचायत ४ च्या गावप्रमुखाचे मीम व्हिडिओ वापरून "छी सासूर..." म्हटले आहे.
कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांचा हा चित्रपट २५ डिसेंबर, ख्रिसमसच्या दिवशी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.