

नेपाळमध्ये नुकतेच नवीन पंतप्रधान सुशीला कर्की यांनी शपथ घेतली. सुशीला यांचे भारतासोबतचे खास नाते होते. सुशीला यांचे भारताशीही खास नाते आहे. त्यांचे शिक्षण वाराणसी येथे झाले आहे. हंगामी सरकारचे प्रमुख असलेल्या सुशीला यांच्याशी बॉलीवुडचा काहीसा हटके संबंध आहे. 70 च्या दशकात घडलेल्या घटनेचा संदर्भ नवीन पंतप्रधान सुशीला यांच्याशी आहे (Latest Entertainment News)
70च्या दशकात बॉलीवूड अभिनेत्री माला सिन्हा स्वत: हायजॅकर्सच्या तावडीत सापडल्या होत्या. आणि हे विमान हायजॅक केले होते सुशीला यांच्या पतीने.
ही घटना आहे 10 जून 1973ची. त्यावेळो रॉयल नेपाळ एयरलाईंन्सचे एक विमान विराटनगरहून काठमांडूला जात होते. तेव्हा अचानक या विमानाला हायजॅक केले गेले. या विमानात 19 प्रवासी होते. यात एक होते दुर्गा प्रसाद सुबेदी आणि दुसरी व्यक्ति होती अभिनेत्री माला सिन्हा.
त्यावेळी दुर्गा प्रसाद नेपाळी काँग्रेसचे सदस्य होते. त्यांच्यासोबत नागेंद्र धुंगेल आणि वसंत भट्टराई हे सदस्य होते. या तिघांनी मिळून हे विमान हायजॅक केले.
या हायजॅकचा हेतु कोणत्याही प्रवाशाला धोका पोहोचवणे हा नव्हता. खरे तर त्यावेळी नेपाळी काँग्रेस पार्टीचे नेता राजेशाही विरोधात लढा देत होते. यासाठी त्यांना पैशाची गरज होती. त्यावेळी त्यांना संशय होता की या विमानातून 30 लाख रुपये नेले जात होते. त्यावेळी हे हस्तगत करण्यासाठी हे विमान हायजॅक केले होते.
हायजॅकर्सने विमान बिहारच्या फारबिसगंजमध्ये जबरदस्ती उतरवले गेले. त्यानंतर पैसे कारने दार्जिलिंगला पाठवले गेले. यानंतर दुर्गाप्रसाद आणि सहकारी यांना मुंबईमधून अटक केली गेली. त्यांना दोन वर्षांचा कारावास झाला. अर्थात प्रवास करत असलेल्या माला सिन्हा यांना या प्रकरणात काही त्रास झाला नाही. पण त्या दरम्यान त्या चांगल्याच घाबरल्या होत्या.
दुर्गा प्रसाद यांनी नंतर पुढे जाऊन सुशीला यांच्याशी विवाह केला.