सरदार नव्हे तर सरदार जी...;दिलजीत दोसांझच्या 'सरदार जी ३' ची रिलीज डेट आली समोर

दिलजीत दोसांझच्या 'सरदार जी ३' ची रिलीज डेट आली समोर
Diljit Dosanjh
दिलजीत दोसांझच्या 'सरदार जी ३' ची रिलीज डेट आली समोर Diljit Dosanjh
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता दिलजीत दोसांझने त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलं आहेत. यानंतर आता चाहत्यांना आनंद द्विगुणीत करत 'सरदार जी ३' हा पंजाबी चित्रपट घेवून येत आहे. आता चित्रपटातील नवं मोशन पोस्टर आणि रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे.

अभिनेता दिलजीत दोसांझाने नुकतेच त्याच्या इंस्टाग्रामवर आगामी 'सरदार जी ३' चे मोशन पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये दिलजीतची फक्त सावली दिसत आहे. याशिवाय त्याच्यावर "सरदार जी ३'' २७ जून २०२५ रोजी जगभरात प्रदर्शित होईल." असे लिहिले होते. यावरून हा चित्रपट पुढच्या वर्षा म्हणजे, २७ जून २०२५ रोजी रिलीज होणार आहे.

दरम्यान या पोस्टरच्या बॅकग्राऊडला एक ऑडिओ क्लिप आहे. ज्यामध्ये तो त्याला ""सरदार" ऐवजी ''सरदार जी'' म्हटलं जाते. यानंतर त्याला ओरडले जाते. याशिवाय त्याच्या गाण्याचा आवाजही ऐकायला येत आहे. या चित्रपटाची निर्मिती व्हाईट हिल स्टुडिओ आणि स्टोरीटाइम प्रॉडक्शन यांच्या संयुक्तपणे केली आहे. याबबातची माहिती सोशल मीडियावर मिळताच चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

'सरदार' फ्रँचायझीचा पहिला चित्रपट २०१५ मध्ये लाँच झाला होता. ज्यामध्ये दिलजीतसोबत मँडी तखर आणि नीरू बाजवा दिसले होते. याचे दिग्दर्शन रोहित जुगराज यांनी केलं होते. नंतर 'सरदार जी २' २०१६ मध्ये रिलीज झाला होता. ज्यामध्ये दिलजीतने तीन वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. त्यात मोनिका गिल आणि सोनम बाजवाही दिसल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news