नताशाकडून अभिनंदन नाही! हार्दिकसोबतच्या घटस्फोट चर्चेने पुन्हा धरला जोर

नताशा स्टेनकोविक-हार्दिक पांड्याच्या घटस्फोटाची पुन्हा चर्चा
hardik pandya-natasa stankovic
नताशाने वर्ल्ड कप विजयानंतर एकही पोस्ट केली नाहीnatasha stankovic Instagram

पुढारी ऑनलाईन डेस्क : काही दिवसांपासून नताशा स्टेनकोविक आणि हार्दिक पांड्या यांच्यात काहीतरी बिनसल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर देखील त्यांच्या वादाची चर्चा झाली होती. दरम्यान, नताशाने मागील काही महिन्यांपासून आपल्या इन्स्टाग्रामवर हार्दिक सोबतचा कोणताही फोटो शेअर केलेला नाही. आता तिने भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर काहीही पोस्ट केलेलं नाही. शिवाय तिने टीमचं देखील अभिनंदन केलेलं नाही.

hardik pandya-natasa stankovic
किमोथेरपीचा पहिला फोटो शेअर; हिना खानवर उपचार सुरु

वर्ल्ड कपमध्ये इंडियन क्रिकेट टीमने दमदार परफॉर्मन्स केला. सोशल मीडियावर फॅन्स ते सेलेब्सपर्यंत, जवळपास प्रत्येक जण सोशल मीडियावर वर्ल्ड कपची चर्चा करत आहे. पण, भारतीय क्रिकेट टीमचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टेनकोविकने मौन धारण केले.

hardik pandya-natasa stankovic
पायल मलिक BB OTT 3 बाहेर; नेटिझन्स म्हणाले..'आम्हाला काही पटलं नाही'

हार्दिक पांड्याच्या शानदार खेळीनंतर फॅन्स त्याचे कौतुक करताना थकत नाहीयेत. सोशल मीडियावर हार्दिकबद्दल अनेक पोस्ट पाहायला मिळत आहेत. परंतु, नताशा स्टेनकोविकने क्रिकेटर हार्दिकसाठी कोणतेही अभिनंदनाचे पोस्ट शेअर केले नाही.

hardik pandya-natasa stankovic
तुझ्याविना काहीच शक्य नव्हतं; विराट कोहलीचा अनुष्कावर प्रेमाचा वर्षाव

हार्दिकसाठी एकही पोस्ट नाही

वर्ल्ड कपमध्ये ऐतिहासिक विजयानंतर नताशा स्टेनकोविकने कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा ते वेगळे होण्याची चर्चा होऊ लागली. नताशा नेहमी सोशल मीडियावर हार्दिकच्या विजयावर अभिनंदनाची पोस्ट शेअर करते. परंतु, हार्दिकच्या वर्ल्ड कप विजयावर तिच्याकडून कोणतीही प्रतिक्रीया आली नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news