Nana Patekar|Welcome मधील "आलू ले लो, कांदा ले लो" या सीनसाठी नानांनी दिलेला नकार, मग असा बनला आयकॉनिक डायलॉग

Nana Patekar Welcome movie dialogue story | Welcome मधील "आलू ले लो, कांदा ले लो" या सीनसाठी नानांनी दिलेला नकार, मग असा बनला आयकॉनिक डायलॉग
Nana Patekar
Nana PatekarPudhari photo
Published on: 
Updated on: 

'वेलकम' (2007) चित्रपटातील नाना पाटेकर यांचा "आलू ले लो, कांदा ले लो" हा सीन आणि उदय शेट्टी हे पात्र प्रेक्षकांच्या मनावर आजही कोरलेले आहे. दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी या सीनसाठी नाना पाटेकर यांना कसं तयार केलं, याबद्दल काही रंजक किस्सा आहे.

Nana Patekar
Legendary Nana Patekar|'जमिनीवरचा माणूस!' नाना पाटेकर यांना चित्रपटात पहिली संधी कुणी दिली? जाणून घ्या त्यांचा अद्भूत प्रवास

नाना पाटेकर यांनी कौन बनेगा करोडपती शोमध्ये दिग्दर्शक अनीस बज्मी यांचे नाव घेताना किस्सा ऐकवला होता. नाना यांनी सांगितलं होतं की, अनीस यांच्यावर राग व्यक्त केला होता.

Nana Patekar
Nana Patekar Top 10 Movies: ‘परिंदा’चा अण्णा ते ‘वेलकम’चा उदय शेट्टी; नाना पाटेकर यांच्या 'या' 10 भूमिका आजही विसरता येत नाहीत

'द कपिल शर्मा शो' आणि एका मुलाखतीत बज्मी यांनी सांगितले होते की, नाना पाटेकर यांनी सुरुवातीला ही भूमिका करण्यास दिली होती. कारण त्यांनी फक्त गंभीर किंवा अँग्री यंग मॅनच्या भूमिका केल्या होत्या.

जेव्हा बज्मी स्क्रिप्ट घेऊन त्यांच्या घरी गेले, तेव्हा नाना पाटेकर म्हणाले, "मला गोष्ट ऐकायची नाही, सिनेमा माझ्यासाठी योग्य आहे आणि मी तो केला पाहिजे." बज्मी यांनी हट्ट करून तब्बल ३ तास स्क्रिप्ट ऐकवल्याचे म्हटले जाते. स्क्रिप्ट ऐकल्यानंतर नानांनी बज्मी यांना होकार दिला.

"आलू ले लो" डायलॉगवर नानांचा राग

'कौन बनेगा करोडपती १६' च्या एका भागात स्वतः नाना पाटेकर यांनी खुलासा केला होता की, जेव्हा अनीस बज्मी यांनी त्यांना हा डायलॉग दिला, तेव्हा नानांना खूप राग आला होता. ते बज्मी यांच्यावर चिडले आणि म्हणाले, "हा काय फालतूपणा आहे? सिनेमा साईन केलाय याचा अर्थ असा नाही की माझ्याकडून काहीही करून घ्याल!"

परंतु, अनीस बज्मी यांनी त्यांना समजावले आणि तो सीन कसा करायचा हे करून दाखवलं. नानांनी तो सीन केला आणि तो कल्ट सीन बनला. नाना पाटेकर यांनी अमिताभ यांनी 'कोहराम'मध्ये एकत्र काम केलं था। तेव्हापासून दोघांमध्ये चांगले नाते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news