Nagarjuna son Akhil Akkineni wedding| नागार्जुनच्या धाकट्या मुलाने गुपचुप केलं लग्न; लॉन्ग टाईम गर्लफ्रेंड जैनब रावजी सोबत घेतले सात फेरे
Akhil Akkineni marries zainab ravdjee
मुंबई -साऊथ स्टार नागार्जुनचा धाकटा मुलगा अखिल अक्किनेनीने ६ जून रोजी त्याची लॉन्ग टाईम गर्लफ्रेंड जैनब रावजीशी लग्न केले. या कपलचे फोटो व्हायरल होत आहेत. पहिल्या फोटोत नागार्जुनचा धाकटा मुलगा अखिल पांढर कुर्ता आणि धोतीमध्ये दिसला. दुसरीकडे, जैनबने व्हाईट रेशमी साडी नेसली होती.
हे लग्न हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये झाले, हे ठिकाण अखिलचे आजोबा आणि दिग्गज अभिनेता अक्किनेनी नागेश्वर राव यांनी स्थापन केले होते. आता लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या लग्नाला जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. भाऊ नागा चैतन्य आणि त्याची पत्नी शोभिता धुलिपाला देखील उपस्थित होत्या. हैदराबादमधील जुबली हिल्स येथे सीक्रेट पद्धतीने लग्न केल्याचे सांगितले जात आहे.
पारंपरिक पोषाखात नटले नवदाम्पत्य
अखिल - जैनबने ट्रॅडिशनल तेलुगु वेडिंग आऊटफिट परिधान केला होता. जैनब पेस्टल आयवरी सिल्क साडी आणि गोल्डन ब्लाऊजमध्ये खूप सुंदर दिसत होती. तिने ट्रॅडिशनल गोल्ड ज्वेलरी घातली होती तर अखिलने सिंपल आयवरी कुर्ता - धोती परिधान केले होते.
चिरंजीवी, राम चरण, एसएस राजामौली यासारखे दिग्गज सेलिब्रिटी लग्नाला उपस्थित होते. आता अक्किनेनी फॅमिली ८ जूनला ग्रँड रिसेप्शन पार्टी होस्ट करणार आहे. ही पार्टी अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये ठेवली जाईल. रिपोर्टनुसार, नागार्जुनने मागील आठवड्यात आंध्र प्रदेश, तेलंगानाच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लग्नासाठी त्यांना आमंत्रण दिले होते.
कोण आहे जैनब?
अखिल-जैनब जागील ३ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. जैनब पेशाने आर्टिस्ट आणि आर्ट एक्झिबिटर आहे. ती परफ्यूमचा बिझनेस करते. जैनबचे वडील जुल्फी रावजी कंस्ट्रक्शन इंडस्ट्रीतील दिग्गज आहेत.
याआधी अखिलने २०१६ मध्ये बिजनेस टायकून जी. व्ही. कृष्णा रेड्डी यांची नात श्रिया भूपालशी लग्न केले होते. त्यांचे लग्न २०१७ मध्ये होणार होते पण हे नाते तुटले.

