

Kerala related alleged 65 crore rupees Mithi River desilting scam
मुंबई - अभिनेता डिनो मोरिया आता ईडीच्या निशाण्यावर आला आहे. मीठी नदी घोटाळा प्रकरणी त्याच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. मीठी नदी घोटाळा प्रकरणी ईडीने डिनो मोरियाच्या घरासह मुंबईतील १५ ठिकाणी छापेमारी केल्याचे वृत्त समोर आले आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, ही कारवाई डिनो मोरिया आणि त्याच्या भावाच्या घरासहित मुंबईमध्ये अन्य ठिकाणीही करण्यात आलीय.
काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा अधिकाऱ्यांकडून चौकशी झाली या प्रकरणात त्याचा भाऊ सँटिनोचे देखील नाव समोर आले आहे. त्याचीही चौकशी सुरु आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी केतन कदमच्या फोनमधून डिनो आणि सँटिनोचे नाव पोलिसांना मिळाले होते.
तब्बल ६५ कोटींच्या घोटाळा प्रकरणात त्याला आर्थिक गुन्हे शाखेने समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. यामध्ये त्याचा भाऊ सँटिनोला देखील बोलावण्यात आलं होतं. या प्रकरणाचा मुख्य आरोपी केतन कदमशी दोघांनी फोनवर अनेकदा बातचीत केल्याचे समोर आले आहे.
या घोटाळा प्रकरणी बीएमसीला ६५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. बीएमसीचे काही अधिकारी आणि काही लोकांविरोधात ईडीचे प्रकरण हे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा (EOW) च्या एफआयआरमधून समोर आले. हे एफआयआर मीठी नदीतून गाळ काढण्यासंबंधित तथाकथित तपासासाठी दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात बीएमसीला ६५ कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप आहे.
मीठी नदी घोटाळा प्रकरणात केतन कदम आणि जय जोशी मुख्य आरोपी आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा घोटाळा बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) नदी खोदकाम यंत्रे आणि उपकरणांच्या भाड्यात केलेल्या कथित आर्थिक अनियमिततेशी संबंधित आहे. काही आठवड्यांपूर्वी, आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणातील दोन आरोपी केतन कदम आणि जयेश जोशी यांना अटक केली होती.