'माझ्या जीवाला धोका...' मराठी अभिनेत्‍याने देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंकडे मागितली मदत

मुंबईतील मालाड पूर्व पुष्पार्क, बाणडोंगरी इथल्या चाळीवर काही बिल्डर आणि लोकप्रतिनिधींचा डोळा असून, त्‍यांच्याकडून इथल्या लोकांची घरे जमीनदोस्त करण्याचा प्रयत्‍न सुरू असल्याची केली फेसबुक पोस्ट.
'माझ्या जीवाला धोका...'  मराठी अभिनेत्‍याने देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंकडे मागितली मदत
'माझ्या जीवाला धोका...' मराठी अभिनेत्‍याने देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंकडे मागितली मदतfile photo
Published on: 
Updated on: 

'My life is in danger...' – Marathi actor seeks help from Chief Minister Devendra Fadnavis and Eknath Shinde

मुंबई : पुढारी ऑनलाईन मुंबईतील मालाड पूर्व पुष्पार्क, बाणडोंगरी इथल्या चाळीवर काही बिल्डर आणि लोकप्रतिनिधींचा डोळा असून, त्‍यांच्याकडून इथल्या लोकांची घरे जमीनदोस्त करण्याचा प्रयत्‍न सुरू असल्याची फेसबुक पोस्ट मराठी अभिनेता अभिजित केळकरने केली आहे.

'माझ्या जीवाला धोका...'  मराठी अभिनेत्‍याने देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंकडे मागितली मदत
Diwali 2026 : दिवाळीत लक्ष्मी-गणेशाची एकत्र पूजा करणे का आहे आवश्यक? जाणून घ्या धार्मिक मान्यता

मराठी मालिका, सिनेमांतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता अभिजीत केळकर हा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे. मात्र नुकतीच त्‍याने एक फेसबुक पोस्ट करत त्‍याच्या जीवाला धोका असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मदतीची मागणी केल्याने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

इथल्या बिल्डर आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून स्थानिकांच्या घरं जमिनदोस्त करण्याचा प्रयत्‍न सुरू असल्याचा आरोप त्‍याने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केला आहे.

'माझ्या जीवाला धोका...'  मराठी अभिनेत्‍याने देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंकडे मागितली मदत
INDIA Bloc Rally in Delhi: ४,००० पोलीस आणि २०० सीसीटीव्ही: 'इंडिया' आघाडीच्या रॅलीसाठी दिल्ली पोलिसांचा तगडा बंदोबस्त

मालाड पूर्व, पुष्पापार्क, बाणडोंगरी ह्या आमच्या भागात असलेली आमची घरं हे आमचं सर्वस्व आहे, आमच्या आई वडीलांनी रक्ताचं पाणी करून, काडी काडी जमवून संसार केलेत, ही घरं उभारली आहेत, आम्ही लहानाचे मोठे इकडेच झालोय, ह्या चाळीतच, झोपडपट्टीत म्हणा हवं तर... गोरगरिबांच्या डोक्यावरचं छप्पर हिरावून, त्यांना रस्त्यावर आणण्याचा यशस्वी प्रयत्न, लोकप्रतिनिधींकडून राजरोसपणे होतोय, बिल्डरने ह्या लोकप्रतिनिधींना आणि सगळ्या systems ना पैशाच्या जोरावर आपल्या हातातलं खेळणं केलंय, स्थानिक गुंडांना पाळून, लोकांना धमक्या देऊन, धड कुठलीही agreements न करता, कागदपत्र न दाखवता, लोकांची घरं जमीनदोस्त करतायत... ह्याचा अनुभव गेले सहा महिने मी घेतोय आणि त्यांच्याशी लढतोय असं त्‍याने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Pudhari

मी कोणालाही घाबरत नाही... माझ्या जीवाला धोका आहे पण मी घरी माझ्या आईला आणि बायको मुलांना सांगून निघालोय) आम्हाला आमची हक्काची घरं हवी आहेत आणि त्यासाठी आपली मदत हवी आहे, आम्ही redevelopment च्या विरोधात नक्कीच नाही पण ज्या development चा पायाच fraud documents वर उभारला जातोय ती development पोकळ आहे... आम्हाला न्याय हवाय, तो आपल्याकडून मिळेल ह्याबद्दल मला खात्री आहे... बाकी देवाक काळजी🙏 असं त्‍याने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.