Mirzapur 3 Munna Bhaiyya
अभिनेता दिव्येंदू शर्मा मुन्ना भैय्याच्या भूमिकेत. File Photo

दमदार आवाजात आज मुन्ना भैय्याची वापसी; Mirzapur 3 Bonus Episode ची प्रतीक्षा

'हम क्या गए पूरा बवाल मच गया;' मुन्ना भैय्याची वापसी
Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क - मिर्जापुरचा भौकाल सीजन १ नंतर सीरीज ३ देखील रिलीज झाला. या सीरीजने पुन्हा एकदा सर्वांना प्रेमात पाडले. मिर्जापूर ३ मध्ये फॅन्सना केवळ एका गोष्टीची खंत होती ते म्हणजे मुन्ना भैय्याची वापसी. फॅन्स नाराज झाले होते की, मुन्ना भैय्या या शोमध्ये नाही. आता फॅन्सची नाराजी दूर झाली आहे. कारण दमदार आवाजात मुन्ना भैय्य़ाची वापसी होतेय. निर्माते फॅन्ससाठी ३० ऑगस्ट रोजी बोनस एपिसोड घेऊन येत आहेत. मिर्जापूर ३ चा बोनस एपिसोड येणार असून त्याचा प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये मुन्ना भैय्या भेटीला येत आहे. मुन्ना भैय्या पाहिल्यानंतर फॅन्सचे आनंद गगनात मावेना.

मिर्जापूर सीजन ३ चा बहुप्रतीक्षित बोनस एपिसोड ३० ऑगस्ट रोजी ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रीमियरसाठी तयार आहे.

मिर्जापूर सीजन ३ काही सीन्स डिलीट केले?

या एपिसोडमध्ये सीजन ३ मधून काही सीन्स हटवण्यात आल्याची माहिती आहे. त्यामध्ये मुन्ना भैय्याच्या नावाने प्रसिद्ध दिव्येंदु शर्माद्वारा कथनसोबत प्रस्तुत करण्यात आले आहे.

मुन्ना भैय्याची भूमिका अभिनेता दिव्येंदु शर्माने साकारली आहे. तो या प्रोमोमध्ये म्हणताना दिसतोय- “हम क्या गए पूरा बवाल मच गया, सुना है हमारे वफादार प्रशंसक बहुत मिस किये हमको। सच कहें तो मिस तो हम भी बहुत की आप लोगों को। हमारे लिए वफादारी का मूल्य सबसे अच्छा है और आपकी वफादारी के लिए रॉयल्टी तो बनती है। सीजन 3 में कुछ चीज़ मिस किये आप, वो हम खोज के लेके आये, सिर्फ आपके लिए मुन्ना त्रिपाठी के सौजन्य से.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news