

अलीकडेच अभिनेते, निर्माते महेश कोठारे यांच्या एका व्हायरल व्हीडियोनंतर जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. या व्हीडियोमध्ये महेश कोठारे हे भाजपावर स्तुतिसुमने उधळताना दिसत आहेत. एका कार्यक्रमात त्यांनी मी मोदी भक्त आहे आणि मुंबई महापालिकेत कमळच फुलेल असे वक्तव्य केले. तसेच त्यांनी संजय राऊत आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही टीका केली. (Latest EntEntertainment News)
यानंतर महेश यांच्यावर अनेकानी टीका केल्या. पण अभिनेत्री मेघा धाडेने मात्र महेश यांची पाठराखण केली आहे. मेघा यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे. ज्यात त्या म्हणतात, ‘अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने उध्दव सेना जॉइन केली होती तेव्हा कोणत्याही भाजप प्रवक्त्याने तिच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर आक्षेप घेतला नव्हता !, सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकरने तर मनसेच्या तिकिटावर लोकसभा लढवली होती तरी कोणी आक्षेप घेतला नाही !.
परंतु महेश कोठारेंनी मोदींची तारीफ केली की उध्दव सेनेला इंगळ्या डसल्या ! कोठारेंवर टीकेची झोड उठवली गेली ! त्यांच्या मराठीपणावर देखील शंका घेण्यात आली. हे असे झाले कारण कोठारे जे बोलले ते मनापासून बोलले कोणत्या तिकीटाच्या लालसेपोटी, कोणाचे पाकीट मिळवण्यासाठी ते असे बोलले नाही एक सामान्य मुंबईकरांची जी भावना आहे जो मुंबईकर आधी रस्त्यावर धक्के खायचा तो आता मेट्रोत गार वाऱ्यात वेगाने प्रवार, करतोय जो मुंबईकर आधी ट्रॅफिक मध्ये अडकायचा आता तो अटल सेतूवरून सुसाट धावतोय त्या मुंबईकरांच्या भावनांचे प्रगटीकरण कोठारेंच्या भाषणात झाले आणि म्हणूनच उध्दव सेनेच्या पायाखालची जमीन सरकली ! आणि हे सत्यात देखील उतरणार आहे.’
या पोस्टवर अभिनेते शरद पोंक्षे यांनीही कमेंट केली आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, मीही मोदांचं कौतुक करतो अमित शहांच कौतूक करतो.जेजे चांगले आहेत त्यांचं करतो. सद्य परिस्थितीत भाजप शिवाय देशाला पर्याय नाही माझं मत मांडले. द्या किती शिव्या द्यायच्यात त्या.’ तर अनेकांनी या पोस्टवर तिने राजकारणात उतरु नये अशीही कमेंट केली आहे.