मुंबई क्रुझवर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसोबत पकडली गेलेली मुनमुन धमेचा (munmun dhamecha) चर्चेत आहे. मुनमुनकडे कमी प्रमाणात ड्रग्ज सापडले, त्यामुळे तिला जामीन मिळावा, असा युक्तीवाद तिच्या वकिलांनी आज कोर्टात केला.
मुंबईतील एका क्रुझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी आर्यन खान याच्यासह अन्य लोकांना अटक करण्यात आली. यामध्ये मुनमुनचाही समावेश होता.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने एका हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीवर छापा टाकला होता. यामध्ये ८ लोकांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर सर्वांची चौकशी करण्यात आली. त्यावेळी या सर्वांना अटक करण्यात आली. यावेळी शाहरुखचा मुलगा आर्यनसोबत मुनमुनही होती.
मुनमुन एक मॉडल आहे. ती ३९ वर्षांची आहे. 'एनसीबी'ने ३ ऑक्टोबरला दुपारी २ वाजता तिला अटक केली होती. ती मूळची मध्य प्रदेश राज्यातील सागर जिल्ह्यातील आहे. तिचे वडील उद्योजक होते. त्यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तिच्या आईचे गेल्या वर्षी निधन झाले. तिचा भाऊ प्रिंस धमेचा हा दिल्लीत वास्तव्याला आहे.
मुनमुनने आपले शालेय शिक्षण सागर जिल्ह्यात पूर्ण केले. सागर जिल्ह्यात फार कमी लोकांना तिच्याबद्दल माहिती आहे. कारण मागील काही वर्ष ती आपल्या भावासोबत दिल्लीत आणि त्याआधी भोपाळमध्ये राहिली आहे.
अभिनेता केआरके (कमाल आर खान) ने एक ट्विट केलंय. आर्यन खानची केस पाहून बॉलिवूड स्टार किड्स भारत सोडून जाण्याचा निर्णय घेत असल्याचा त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. तो म्हणाला- माझ्या सूत्रांनुसार आर्यन खानच्या घटनेनंतर अनेक सेलिब्रिटी किड्स भारत सोडण्याचा विचार करताहेत. जर आर्यन खानच्या बाबतीत असे घडू शकते, तर ते कोणासोबतही होऊ शकते. असे स्टारकिड्सना वाटतेय.' केआरकेच्या या ट्विटची खूप चर्चा होतेय.