

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉसच्या घरात स्पेशल गेस्ट एंट्री होणार आहे. लवकरच बिग बॉस १७ विनर कॉमेडियन मुनव्वर फारूकी ओटीटी ३ मध्ये दिसणार आहे. आता जिओ सिनेमाने या वृत्ताची पुष्टी केली आगे. काही वेळापूर्वी सोशल मीडियावर मुनव्वर फारूकीचे फोटो शेअर करून या गोष्टीचा खुलासा केला आहे की, मुनव्वर शोमध्ये दिसणार आहे. आता घरामध्ये गेम पलटणार का, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
आता असे म्हटले जात आहे की, मुनव्वर फारूकीच्या एंट्रीने बिग बॉसचा खेळ पलटणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याला शोमध्ये एका टास्कसाठी बोलावलं जात आहे. या टास्कमध्ये काही तरी असं होईल की, प्रेक्षक देखील दंग राहतील. गेम असे बदलेल की, सर्वांचा विचार मागे पडेल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा दावा करण्यात आला आहे की, मुनव्वर फारूकीच्या एन्ट्रीनंतर घरातील एक स्पर्धक बाहेर पडेल. घरात एक टास्क होईल, जिथे मुनव्वर फारूकी कंटेस्टंट्सशी प्रश्न करेल आणि त्यांना सर्व प्रश्नांची उत्तरे देखील द्यावे लागतील. नंतर मुनव्वर फारूकी त्या कंटेस्टेंटचे नाव घोषित करेल. त्यानंतर त्या स्पर्धकाचा प्रवास बिग बॉसमधून संपेल.