

पुढारी ऑनलाईन डेस्क : सलमान खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खूप जुना आहे. यामध्ये सलमान एक मुलीसाठी आपले Bone Marrow Donate करण्याविषयी बोलत आहे. कारण त्याच्या बोन मॅरोच्या मदतीनेच ब्लड कॅन्सरने पीडित मुलीला वाचवलं जाऊ शकत होतं. त्यानुसार, बोन मॅरो डोनेट करणारा सलमान खान पहिला भारतीय ठरला होता. काय आहे तो किस्सा जाणून घेऊया.
सलमानचा जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तो २०१० सालाच्या आसपासचा आहे. एका कार्यक्रमातील हा व्हिडिओ आहे. एक महिला सलमान खानला विनंती करते की, सलमान खानला पाहायला आलेल्या जनतेला आवाहन करावं की, लोकांनी जाऊन आपले बोन मॅरो रजिस्ट्रेशन करावे. तिची मुलगी एका गंभीर आजाराने त्रस्त आहे. तिच्यावर उपचार केवळ बोन मॅरोने होऊ शकतात. तेव्हा सलमानने त्या महिलेला सांगितलं की, त्याचे बोन मॅरो त्या मुलीला मॅच झालं तर ते डोनेट करायला तयार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अशी माहिती आहे की, सलमानला जेव्हा समजलं की पूजा नावाची एका छोट्या मुलीला उपचारासाठी बोन मॅरोची गरज आहे. तेव्हा त्यांची एक फुटबॉल टीम होती. सलमान आपल्या फुटबॉल टीम सोबत आपला बोन मॅरो डोनेट करण्यासाठी तयार झाला. पण, ऐनवेळी फुटबॉल टीमचे सदस्य मागे हटले. त्यावेळी सलमान आणि त्याचा भाऊ अरबाजने बोन मॅरो डोनेट केलं.
एका मुलाखतीत सुनील शेट्टी यांनी देखील सलमानच्या या गोष्टीबद्दल सांगितले होते. सुनील शेट्टी म्हणाले, "सलमान एक चांगला माणूस आहे. मी त्याच्यासाठी काय केलं आहे? काही नाही. सलमानने अनेक वर्षांपूर्वी आपले बोन मॅरो दान केले आहे. तो एक असा माणूस आहे, जो समाजात बदल पाहू इच्छितो. म्हणूनच ईश्वराची त्याच्यावर कृपा आहे...."