

अभिनेता मुकेश खन्ना यांनी रामायणबाबत आपले मत नोंदवले आहे. रणबीर कपूर यांनी रामाच्या व्यक्तिरेखेबाबत बोलताना ते म्हणतात, ‘मला वाटते रणबीर चांगला अभिनेता आहे पण त्याचा मागचा सिनेमा अॅनिमलमधील भूमिका पाहता ही व्यक्तिरेखा त्याच्यासाठी आव्हान ठरू शकेल.’ (Latest Entertainment News)
एका मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी हा खुलासा केला. ते म्हणतात, 'या सिनेमात रामाला झाडांवर चढताना आणि बाण मारताना दाखवले आहे. पण असे केवळ कृष्ण किंवा अर्जुन करू शकत होते. पण राम असे करू शकत नाहीत. जर राम योद्धा आहेत त्यांनी वानरांकडून मदत घेतली नाही. रावणाशी लढण्यासाठी ते एकटेच बाकी होते.
जसे मी पाहतो आहे त्यावरून मी सांगू शकत नाही की रणबीर कपूर मर्यादा पुरुषोत्तम उत्तम प्रकारे साकारू शकतो की नाही. तो उत्तम अभिनेता आहे. तो उत्तम अभिनेता आहे. पण त्याची इमेज वेगळी आहे, अॅनिमल सारख्या सिनेमांनी ती बनवली आहे. मला यावर काही आक्षेप नाही. ते करू शकतात. पण तुम्ही रामाला योद्धा बनवले तर लोक स्वीकार करणार नाहीत. ते हात जोडून नम्रपणे 14 वर्षांचा वनवास स्वीकारणारे आहेत, शबरीची उष्टी बोर खाणारे आहेत. ते तीर कमान चालवत नाहीत.’
यावेळी त्यांनी प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या आदिपुरुष सिनेमाबाबतही उद्गार काढले. ते म्हणतात, 'रामायणापेक्षा महत्त्वाचा विषय असूच शकत नाही. पण मी पाहिले आहे की त्यांनी कशाप्रकारे आदिपुरुषची चटणी बनवली आहे.
आता याला कोणी दुसरे बनवत आहे. तुम्ही अशा प्रकारे बनवत राहाल तर हिंदू तुम्हाला सोडणार नाहीत.’
शक्तिमान या प्रसिद्ध भारतीय सुपरहीरो आता सिनेमाच्या रुपात समोर येणार असल्याबाबत ही त्यांनी मत व्यक्त केले आहे. मुकेश खन्ना यांना रणवीर मुख्य भूमिकेत दिसण्याबाबत प्रचंड आक्षेप आहे.