MTV Splitsvilla X5 : जशवंत बोपन्ना-आकृती नेगीने जिंकला स्प्लिट्सविला शो

स्प्लिट्सविला X5 जिंकल्यानंतर आकृती नेगीने जशवंत बोपन्नाच्या आईचे घेतले आशिर्वाद
MTV Splitsvilla X5 show
आकृती नेगी-जशवंत बोपन्ना लोकप्रिय डेटिंग रिॲलिटी शोचे विजेते ठरले Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जशवंत बोपन्ना-आकृती नेगी हे 'एमटीव्ही स्प्लिट्सविला सीजन १५ : एक्सस्क्वीज मी प्लीज'चे विजेते बनले आहेत. लोकप्रिय डेटिंग रिॲलिटी शोचा ग्रँड फिनाले रविवार, ११ ऑगस्ट रोजी पार पडला. फिनालेच्या रेसमध्ये अन्य फायनालिस्ट जोडी हर्ष अरोरा आणि रुशाली यादवची होती. (MTV Splitsvilla X5 show )

फिनालेच्या रेसमध्ये या होत्या जोड्या

सनी लिओनी आणि तनुज विरवानीद्वारा होस्ट करण्यात आलेला डेटिंग रिॲलिटी टीव्ही शोच्या ग्रँड फिनालेमध्ये तीन जोड्या समाविष्ट झाल्या. पॉवर मॅच जोडी दिग्विजय राठी आणि कशिश कपूर, लव्ह मॅच जोडी हर्ष अरोरा आणि रुशाली यादव, आयडियल मॅच जोडी जशवंत बोपन्ना आणि आकृति नेगी होते. फिनालेमध्ये मुनव्वर फारुकी आणि उर्फी जावेद पाहुणे बनून आले. त्यानंतर दिग्विजय आणि कशिशला फिनाले टास्कच्या आधी पहिल्या शोतून बाहेर करण्यात आलं.

विजयावर काय म्हणाली आकृती नेगी?

आकृती नेगीने विजयावर उत्साह व्यक्त केला. 'मी माझा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही. मी या सोमधील माझा पार्टनर जशवंत सोबत 'एमटीव्ही स्प्लिट्सविला एक्स 5: एक्सस्क्वीज मी प्लीज' जिंकणे, माझ्यासाठी खूप खास आहे. आम्ही सोबत मिळून काम केलं. विजयाचा किताब आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. आम्ही हे देखील करून दाकवलं.'

जशवंतने व्यक्त केला आनंद

आपल्या विजयानंतर जशवंत बोपन्ना म्हणाला, 'डेटिंग रिॲलिटी शोचा किताब जिंकणे माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे.' दरम्यान, आकृती नेगीने जशवंत बोपन्नाच्या आईचे आशिर्वाद घेतले आणि केकदेखील खाऊ घातला.

MTV Splitsvilla X5 show
BB Marathi - अभिजीतचा नक्की गेमप्लॅन काय? डीपी अन् अंकिताला पडलाय प्रश्न

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news