

मुंबई - हाऊसफुल्ल ५ मधील फू बाई फू फुगडी फू हे गाणे आज ३१ मे रोजी रिलीज झाले आहे. गाण्याचा व्हिडिओ अभिनेता संजय दत्तने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे. हा चित्रपट ६ जूनला रिलीज होणार आहे.
अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडिस, चित्रांगदा सिंह, चंकी पांडे, नाना पाटेकर, फरदीन खान, डिनो मोरिया, जॅकी श्रॉफ, सौंदर्या शर्मा, सोनम बाजवा, निकितन धीर आणि जॉनी लीवर हे कलाकार एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. साजिद नाडियाडवालाने चित्रपट निर्मिती केलीय.
रिपोर्टनुसार, सेन्सॉर बोर्डाने 'हाऊसफुल्ल ५' चित्रपटाला हिरवा कंदील दाखवला आहे. पण काही सीन्स कट करून U/A 16+ सर्टिफिकेट दिले जाणार आहे. लहानांपासून वृद्धापर्यंत प्रत्येक जण हा चित्रपट पाहू शकतो. एक डायलॉग पूर्णपणे हटवण्यास सांगितले आहे, बॉटलमधून शँपेन काढतानाचा एक सीन कट करण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटातील एकूण ११ सेकंदाचे फुटेज हटवण्यासाठी सांगण्यात आले आहे. हे बदल झाल्यानंतर 'हाऊसफुल-५' चित्रपटगृहात रिलीज होईल. चित्रपटात दोन व्हर्जन असतील, ज्यांना CBFC तून दोन सेन्सॉर सर्टिफिकेट देण्यात आले आहेत. दोन्ही व्हर्जनचे रन टाईन एकसारखेच आहे. हे २ तास ४५ मिनट सेकंदाचे आहे.