

Weekend OTT Release
मुंबई - वीकेंडला घरीबसल्या OTT वर दमदार सीरीज पाहता येणार आहेत. सुपरहीरो ॲडव्हेंचर, इमोशनल ड्रामा, लीगल थ्रिलर सर्व काही सीरीजमध्ये पाहता येणार आहे. नेटफ्लिक्स, जिओ हॉटस्टारवर लेटेस्ट सीरीज आणि चित्रपट पाहता येणार आहेत.
क्रिमिनल जस्टिस: सीजन ४
OTT प्लॅटफॉर्म : जिओ हॉट स्टार
हा एक लीगल ड्रामा आहे. क्रिमिनल जस्टिस: सीजन 4 मध्ये पंकज त्रिपाठी हे माधव मिश्रा या भूमिकेत आहेत. सीरीजमध्ये श्वेता बसु प्रसाद, मोहम्मद जीशान अय्यूब, आशा नेगी यांच्याही भूमिका आहेत.
कॅप्टन अमेरिका : ब्रेव न्यू वर्ल्ड
OTT प्लॅटफॉर्म : जिओ हॉट स्टार
कॅप्टन अमेरिका: ब्रेव न्यू वर्ल्ड ओटीटीवर स्ट्रीम होत आहे. मार्वलच्या फॅन्ससाठी ही एक उत्तम सीरीज असून त्याचे दिग्दर्शन जुलियस ओना यांनी केलंय. चित्रपटात एन्थनी मॅकीला सॅम विल्सन म्हणून सादर करण्यात आले आहे. शानदार ॲक्शन थ्रिलर नक्की पाहा
हिट : द थर्ड केस
ओटीटी प्लॅटफॉर्म : नेटफ्लिक्स
सॅलेश कोलानू द्वारा दिग्दर्शित हिट : द थर्ड केस फेमस क्राईम थ्रिलर फ्रेंचाईजमध्ये मनोरंजनात्मक कहाणी आहे. नानी स्टारर अर्जुन सरकार, होमिसाईड इंटरवेंशन टीमचे अधिकारी, अर्जुनला एका नवं केसची जबाबदारी देतो, ज्यामध्ये अनेक खून झालेले असतात.
रेट्रो
ओटीटी प्लॅटफॉर्म : नेटफ्लिक्स
मागच्या युगात घेऊन जाणाऱ्या रेट्रोमध्ये सूर्याने पारीमेलची भूमिका सारापली आहे. पारीमेल हिंसाने भरलेल्या आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करतो. पार्टनर रुक्मिणी (पूजा हेगडे) सोबत एक नवं चॅप्टर सुरू करतो. यामध्ये जयराम, प्रशांत, अमरीन अबूबकर यांच्या भूमिका आहेत.