Actor Milind Gawali: तेव्हा वाटते आपण निर्माता किव्हां दिग्दर्शक व्हावं आणि अशा असंख्य.... अभिनेते मिलिंद गवळींची पोस्ट आहे चर्चेत

आताही त्यांनी गेल्या आठवणींना उजाळा देणारी एक पोस्ट शेयर केली आहे.
Entertainment News
अभिनेते मिलिंद गवळीpudhari
Published on
Updated on

आई कुठे काय करते या मालिकेतील अनिरुद्धच्या व्यक्तिरेखेत दिसलेले अभिनेते मिलिंद गवळी सोशल मिडियावर अॅक्टिव असतात. आताही त्यांनी गेल्या आठवणींना उजाळा देणारी एक पोस्ट शेयर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘असं म्हणतात की आयुष्याचा वेळ कसा पटकन निघून गेला हे जर तुम्हाला कळलंच नाही तर याचा अर्थ असा की तुम्ही तुचं आयुष्य छान जगलात किंव्हा जगत आहात, अनेक वेळा आपण म्हणतो अरे हे वर्ष कसं पटकन निघून गेलं काही कळलं नाही, तर मला असं वाटतं की त्या वर्षामध्ये तुम्ही खूप खूप मन लावून कामं केली आहेत किंवा तुम्ही खूप Involve होऊन जगला आहात, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये सातत्याने अशा गोष्टी घडल्या ज्यामुळे तुम्हाला विचार करायला सुद्धा वेळ मिळाला नाही आणि महिने वर्ष सरून गेली. (Latest Entertainment News)

या दरम्यान आपल्या नवीन हिंदी मालिकेबाबत ते सांगतात, ' आज-काल आमचं " मन पसंत की शादी" चं शूटिंग फिल्म सिटीला सुरू आहे.  रोज मी फिल्म सिटी च्या गेट मध्ये शिरलो की मला 1984 मध्ये फिल्मसिटीच्या रस्त्यावर "हम बच्चे हिंदुस्थान के" चं शूटिंग आठवतं , त्या सिनेमा क्षेत्राचं आणि या फिल्मसिटी चं नातं इतक्या वर्षाचा आहे, हे खरं वाटत नाही, इतकी वर्ष कशी करून गेली कळलंच नाही, या क्षेत्रात तितका रमून गेलो होतो, की काळ कसा पुढे सरकत गेला कळलंच नाही.

Entertainment News
Navratri 2025 : 'श्वेतवस्त्रा' अभिनेत्री स्नेहलता वसईकरचे नवरात्री स्पेशल शूट होते आहे व्हायरल

"मनपसंत की शादी" च्या सेटवर शारदा च्या भूमिकेत सुचित्रा बांदेकर या आहेत, वीस-बावीस वर्षांपूर्वी रत्नाकर मत्करी यांच्या "गहिरे पाणी" च्या "काळी बाहुली" या गोष्टीमध्ये पहिल्यांदा आम्ही एकत्र काम केलं होतं, त्यात माझे आणि सुचित्राचे अनेक सीन्स छान झाले होते, "मनपसंत की शादी" मध्ये सुद्धा आमचे सीन्स मस्त झालेत, त्या दोन वेगळ्या गोष्टी मधल्या परफॉर्मन्स मधला काळ जो निघून गेला आहे तो दोन दशकांपेक्षाही जास्तचा आहे. पण परफॉर्म करताना त्याची कुठेही जाणीव होत नाही.’

आपल्या सिनेप्रवासाबाबत बोलताना ते पुढे म्हणतात, आजकाल तर मला सारखा असं वाटतं कोणत्याही शूटिंग सेटवर सह कलाकार, किंवा युनिट मधले सहकारी packup झाल्यानंतर पुन्हा किती वर्षांनी त्यांची भेट होईल कोणालाही सांगता येणार नाही, पुन्हा त्या कलाकाराची भेट होईल की नाही हेही सांगता येत नाही, माझ्या या इतक्या वर्षाच्या कारकीर्दीत असे असंख्य सहकलाकार आणि तंत्रज्ञ आहेत, ज्यांच्या बरोबर आधी खूप भारी सीन्स केले होते, अतिशय सुंदर उत्कृष्ट सिनेमे मी केले होते, त्यांच्याबरोबर काम करून खूपच छान वाटलं होतं, छान परफॉर्मन्स केल्याचं समाधान मिळालं होतं,  पण या प्रवासामध्ये पुन्हा त्यांची कधीच भेट झाली नाही.  अशा वेळेला वाटतं की आपण निर्माता किव्हां दिग्दर्शक व्हावं आणि अशा असंख्य उत्कृष्ट कलाकारांबरोबर पुन्हा नव्याने काम करावं. आता सुचित्रा बांदेकर यांच्याबरोबर काम करून मला खरच खूप समाधान मिळतं, त्यांनी शारदा शिंदे ही भूमिका छान वटवल्यामुळे माझी राजाराम शिंदे ची भूमिका खूपच Effective and Enhance होत आहेत.

Entertainment News
Pawan Kalyan: ऐन गर्दीत तलवारबाजी करणे अभिनेता पवन कल्याणला भोवले; थोडक्यात वाचला बॉडीगार्डचा जीव

मिलिंद सध्या मनपसंत की शादी या हिंदी मालिकेत दिसत आहेत. या मालिकेत त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत सूचित्रा बांदेकर दिसत आहेत. सूचित्रा यांच्यासोबतच्या आठवणीना उजाळा देणाऱ्या मालिकांबाबत त्यांनी ही पोस्ट शेयर केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news