Nagraj Manjule Matka King |नागराज मंजुळेंचा मोठा खुलासा, 'मटका किंग'मधील बृज भाटीची व्यक्तिरेखा कशी घडली?

Nagraj Manjule Matka King - अशी तयार झाली 'मटका किंग'ची कहाणी, नागराज मंजुळेंनी केला मोठा खुलासा
vijay varma-Nagraj Manjule
Nagraj Manjule Matka King series instagram
Published on
Updated on
Summary

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची बहुप्रतिक्षित वेब सीरिज 'मटका किंग' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या निमित्ताने नागराज यांनी मुख्य अभिनेता विजय वर्मा याच्या कामाचे भरभरून कौतुक केले आहे. विजयने 'बृज भाटी' या व्यक्तिरेखेसाठी घेतलेली मेहनत आणि त्याचे बारकावे समजून घेण्याची पद्धत यामुळे तो मालिकेत खऱ्या हिरोसारखा वाटतो, असे नागराज म्हणतात. या मालिकेच्या माध्यमातून नागराज मंजुळे पुन्हा एकदा १९६०-७० च्या दशकातील मुंबईतील मटका आणि जुगाराचे जग प्रेक्षकांसमोर उभे करणार आहेत.

Nagraj Manjule Matka King vijay varma role

नागराज मंजुळे आता ओटीटी विश्वात धमाका करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांची आगामी वेब सीरिज 'मटका किंग' सध्या सर्वत्र चर्चेत आहे. प्राईम व्हिडिओवर रिलीज होणाऱ्या या सी विजय वर्मा मुख्य भूमिकेत आहे. या प्रोजेक्टबद्दल आणि विजयसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल नागराज यांनी आपले मत व्यक्त केले आहे.  या कथेकडे ते कशाप्रकारे आकर्षित झाले आणि त्यांनी बृज भाटी सारखा प्रामाणिक, हुशार आणि धाडसी व्यक्तिरेखा कशी घडवली, “मटका किंग” तयार करतानाची कहाणी त्यांनी सांगितली.

खऱ्या अर्थाने 'बृज भाटी'

नागराज मंजुळे यांच्या मते, विजय वर्मा हा एक अत्यंत विचारवंत अभिनेता आहे. विजय एक उत्कृष्ट अभिनेता आहे, आणि त्याच्यातली मला सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे तो आपल्या व्यक्तिरेखेवर खूप खोलवर विचार करतो. प्रत्येक सीनमध्ये त्याचा पात्र असं का वागतोय, हे समजून घेण्यासाठी तो सतत प्रश्न विचारतो. आम्ही अनेकदा शूटिंगपूर्वी बसून सीनवर चर्चा करत असू. मी नेहमी थोडी मोकळीक ठेवतो, जेणेकरून शेवटच्या क्षणी बदल करता येतील, आणि विजयचे प्रश्न आम्हाला आमच्या मर्यादेपलीकडे घेऊन गेले. त्यामुळे प्रत्येक सीन अधिक चांगला बनला, कारण मटका किंग हा बारकाव्यांचा खेळ आहे. त्याने खूप संयमाने काम केले आणि या भूमिकेत आपलं पूर्ण मन ओतलं. आता जेव्हा तुम्ही हे पाहाल, तेव्हा तो खरोखर या मालिकेत हिरोसारखा दिसतो, असे नागराज सांगतात.

vijay varma-Nagraj Manjule
Ginny Wedss Sunny 2 trailer: लग्नाचा गोंधळ अन् प्रेमाचा तडका! अविनाश तिवारी-मेधा शंकरच्या 'गिन्नी वेड्स सनी २' ची रिलीज डेट जाहीर

का निवडली 'मटका किंग'ची कथा?

मटका जगाबद्दल बोलताना नागराज म्हणाले की, जेव्हा ही कल्पना त्यांच्याकडे आली, तेव्हा त्यांना त्यांच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. ६०-७० च्या दशकात मटका हा खेळ खूप लोकप्रिय होता. नागराज यांनी 'बृज भाटी' या पात्राची तुलना एका शास्त्रज्ञासारखी आहे, ज्याने बुद्धिमत्ता आणि धाडसाच्या जोरावर स्वतःचे साम्राज्य निर्माण केले.

तगडी स्टारकास्ट

या मालिकेत केवळ विजय वर्माच नाही, तर सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, कृतिका कामरा, गुलशन ग्रोवर आणि भारत जाधव, भूपेंद्र जडावत यांसारखे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. नागराज मंजुळे आणि अभय कोराणे यांनी ही मालिका क्रिएट केली आहे. शिवाय, गिरीश कुलकर्णी, जेमी लीव्हर, किशोर कदम, सायरस सहुकार, अर्पिता सेठिया, संभाजी तांगडे, इश्तियाक खान, संजीव जोटांगिया आणि सिमरन अश्विनी देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

vijay varma-Nagraj Manjule
Cocktail-2 First song Jab Talak | फ्रेंडशीप, लव्ह अन् टोटल मॅडनेस! कॉकटेल २ मधून शाहिद-क्रिती-रश्मिकाचा धमाल डान्स, पाहा व्हिडिओ

कुठे आणि कधी पाहाल?

'मटका किंग'चा प्रीमियर १७ एप्रिल २०२६ रोजी प्राइम व्हिडिओवर होणार आहे. ही मालिका केवळ भारतातच नाही, तर जगातील २४० देशांमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे. अभय कोराणे यांनी क्रिएट आणि लिहिलेली, तसेच नागराज पोपटराव मंजुळे यांनी क्रिएट, लिखित आणि दिग्दर्शित ही सीरीज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news