Ginny Wedss Sunny 2 trailer: लग्नाचा गोंधळ अन् प्रेमाचा तडका! अविनाश तिवारी-मेधा शंकरच्या 'गिन्नी वेड्स सनी २' ची रिलीज डेट जाहीर

Ginny Wedss Sunny 2 trailer: 'गिन्नी वेड्स सनी २' चा ट्रेलर प्रदर्शित! लग्नाचा मांडव आणि प्रेमाचा पेच; '१२ वी फेल' फेम मेधा शंकरच्या जोडीला अविनाश तिवारी
Ginny Wedss Sunny 2 poster
Ginny Wedss Sunny 2 trailer released pudhari photo
Published on
Updated on
Summary

बॉलिवूडमध्ये सध्या सिक्वेलचे वारे वाहत असून, त्यामध्ये आता 'गिन्नी वेड्स सनी २' या चित्रपटाची भर पडली आहे. ९ एप्रिल २०२६ रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून, यात अविनाश तिवारी आणि '१२ वी फेल' फेम मेधा शंकर यांची फ्रेश जोडी पाहायला मिळत आहे. विसंगत स्वभाव असूनही प्रेमात पडलेल्या कपलची ही 'रोमँटिक कॉमेडी' कथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Avinash Tiwary-Medha Shankr Ginny Wedss Sunny 2 trailer

एका नवीन जोडीची चर्चा रंगली आहे, ती म्हणजे अविनाश तिवारी आणि मेधा शंकर. त्यांच्या आगामी 'गिन्नी वेड्स सनी २' (Ginny Weds Sunny 2) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच ९ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर आता हा दुसरा भाग प्रेक्षकांसाठी येत आहे.

Ginny Wedss Sunny 2 poster
Cocktail-2 First song Jab Talak | फ्रेंडशीप, लव्ह अन् टोटल मॅडनेस! कॉकटेल २ मधून शाहिद-क्रिती-रश्मिकाचा धमाल डान्स, पाहा व्हिडिओ

काय आहे ट्रेलरमध्ये खास?

ट्रेलरची सुरुवात एका गोंधळलेल्या लग्नाच्या वातावरणाने होते. अविनाश तिवारी;ा अभिनय लक्षवेधी ठरतोय. १२ वी फेल फेम मेधा शंकर हिने आपल्या सोज्वळ आणि तितक्याच सहज भूमिकेने ट्रेलरमध्ये जीव ओतलाय. ही कथा दोन अशा व्यक्तींभोवती फिरते, ज्यांचे स्वभाव एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. या विसंगत स्वभावामुळे निर्माण होणारी कॉमेडी आणि त्यातून बहरणारं प्रेम, हा या चित्रपटाचा मुख्य विषय आहे.

अविनाश आणि मेधाची फ्रेश केमिस्ट्री

'१२ वी फेल' मधील मेधा शंकरच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. या चित्रपटाच्या सहाय्यक भूमिकेत लिलेट दुबे, सुधीर पांडे, गोविंद नामदेव, गोपी भल्ला, नयनी दीक्षित, विश्वनाथ चॅटर्जी आणि रोहित चौधरी यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. 'गिन्नी वेड्स सनी २' चे निर्माते विनोद बच्चन यांनी यापूर्वी 'तनु वेड्स मनु' (२०११), 'शादी में जरूर आना' (२०१७) आणि 'गिन्नी वेड्स सनी' (२०२०) यांसारख्या रोमँटिक चित्रपटांची निर्मिती केली आहे.

Ginny Wedss Sunny 2 poster
Allu Arjun Raka | अल्लू अर्जुनचा वाढदिवशी मोठा धमाका! 'राका' चित्रपटाचा अतरंगी लूक व्हायरल; ॲटली आणि दीपिकाची मिळणार साथ

कधी होणार प्रदर्शित?

ट्रेलर लाँच सोहळ्यात निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. 'गिन्नी वेड्स सनी २' हा चित्रपट २४ एप्रिल २०२६ रोजी सर्वत्र चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाच्या पहिल्या भागात, अभिनेत्री यामी गौतम आणि विक्रांत मेस्सी यांनी काम केले होते. त्याचे दिग्दर्शन पुनीत खन्ना यांनी केले होते. या चित्रपटात आयेशा रझा मिश्रा, शोभा जुनेजा, सुहेल नय्यर आणि ईशा तलवार या कलाकारांचाही समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news