

‘मर्दानी ३’चा ट्रेलर प्रदर्शित होताच राणी मुखर्जी पुन्हा एकदा आपल्या खतरनाक पोलिस अवतारात प्रेक्षकांसमोर आली आहे. थरारक अॅक्शन, गंभीर विषय आणि ताकदवान संवादांनी भरलेला हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
Rani Mukerji Mardaani 3 Trailer released
बॉलिवूडमधील लोकप्रिय ‘मर्दानी’ फ्रँचायझी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘मर्दानी ३’ चा बहुप्रतीक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, राणी मुखर्जी पुन्हा एकदा निर्भीड पोलिस अधिकारी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत दिसत आहे. 'मर्दानी ३' चा ट्रेलर ३ मिनिटे १६ सेकंदाचा हा ट्रेलर अंगावर शहारे आणणारा आहे. राणी मुखर्जी पुन्हा गुन्हेगारांशी भिडायला तयार आहे.
हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. ट्रेलरमध्ये जी कहाणी ऐकवली जाते, ती इतकी भयानक आहे की, तो व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे.
ट्रेलरमध्ये काय आहे?
ट्रेलरची सुरुवात एका खेळणाऱ्या मुलीच्या अपहरणाने होते. शहरात अशा अपहरणाच्या घटना घडताना समोर येते. गेल्या तीन महिन्यांत ९३ मुलींचे अपहरण झाले आहे आणि या सर्व गुन्ह्यांमध्ये 'अम्मा'चा हात आहे, हे उघड होते. अम्मा मुलींचे अपहरण केल्यानंतर पुढे काय करते, हे पाहण्यासाठी चित्रपट पाहावा लागणार आहे.
अॅक्शन भरपूर असलेल्या 'मर्दानी ३'मध्ये प्रभावी डायलॉग्ज आहेत. संगीत आणि ॲक्शन्स सीन्स प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवणारे आहेत. राणीचा कडक पोलिस अवतार यावेळीही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. चित्रपटात जानकी बोडीवाला आणि मल्लिका प्रसाद यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘मर्दानी ३’ ३० जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.