Mardaani 3 Controversy: राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी 3’मुळे वाद; दिल्लीतील बेपत्ता मुलींच्या मुद्द्यावर YRFचा खुलासा, काय घडलं?

Mardaani 3 in Trouble: मर्दानी 3 च्या प्रमोशनसाठी दिल्लीतील बेपत्ता मुलींच्या संवेदनशील रिपोर्टचा वापर केल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला. मात्र Yash Raj Films ने हे आरोप फेटाळत चित्रपट पूर्णपणे काल्पनिक असल्याचं सांगितलं.
Mardaani 3 Controversy
Mardaani 3 ControversyPudhari
Published on
Updated on

Mardaani 3 Promotion Controversy: मर्दानी 3 चित्रपटाच्या प्रमोशनवरून सध्या सोशल मीडियावर मोठा वाद सुरु झाला आहे. राणी मुखर्जीच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाच, काही रिपोर्ट्समुळे निर्मात्यांवर टीकेची झोड उठली आहे.

सोशल मीडियावर असा दावा करण्यात आला की, चित्रपटाच्या प्रचारासाठी दिल्लीतील बेपत्ता मुलींच्या संवेदनशील आकडेवारीचा वापर करण्यात आला. कारण ‘मर्दानी 3’ हा चित्रपटही महिलांच्या सुरक्षेशी संबंधित विषयावर आधारित आहे. त्यामुळे काही युजर्सनी प्रश्न उपस्थित केला की, गंभीर सामाजिक प्रश्नांचा वापर केवळ चित्रपटाच्या जाहिरातीसाठी तर केला जात नाही ना?

हा वाद वाढताच चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या यशराज फिल्म्सने (YRF) अधिकृत निवेदन जारी करत हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. YRF च्या म्हणण्यानुसार, “आमची कंपनी गेली 50 वर्षे नैतिकता आणि पारदर्शकतेच्या तत्वांवर काम करत आहे. ‘मर्दानी 3’च्या प्रमोशनसाठी कुठल्याही संवेदनशील माहितीचा मुद्दाम वापर करण्यात आलेला नाही. सोशल मीडियावर करण्यात येत असलेले आरोप चुकीचे आहेत. योग्य वेळी सर्व खरी माहिती समोर येईल.”

Mardaani 3 Controversy
BCCI Contract: बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये मोठे बदल; विराट–रोहित यांचे डिमोशन, कोणते खेळाडू टॉप कॅटेगरीत?

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिल्लीतील बेपत्ता मुलींच्या घटनांना जोडून बातम्या पसरवल्या गेल्या. यानंतर अनेकांनी निर्मात्यांच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, तर काहींनी हे बेजबाबदार वर्तन असल्याचं म्हटलं.

मात्र YRF ने स्पष्ट केलं की, ‘मर्दानी 3’ ही पूर्णपणे काल्पनिक कथा आहे. या चित्रपटाचा उद्देश मनोरंजनासोबत समाजात जागरूकता निर्माण करणं हा आहे, कोणाच्याही भावना दुखावण्याचा नाही.

Mardaani 3 Controversy
Tirupati laddoo row : धक्कादायक! तिरुपती देवस्थानात २० कोटी लाडूंसाठी वापरले 'भेसळयुक्त' तूप

मर्दानी’ चित्रपटाचे आधीचे भागही महिलांवरील गुन्हे आणि सामाजिक वास्तव संवेदनशील पद्धतीने मांडणारे होते. त्यामुळे नव्या भागाबाबतही गैरसमज पसरवू नयेत, असं निर्मात्यांनी सांगितलं आहे. एकीकडे चित्रपटाला प्रेक्षकांचा पाठिंबा मिळत आहे, तर दुसरीकडे प्रमोशनवरून सुरू झालेला हा वाद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news