Lakshmi Niwas | भावनाच्या गळ्यातल्या मंगळसुत्रामागचं गुपित उलघडणार

'लक्ष्मी निवास' महामुहुर्तात होणार महाखुलासे!
image of Lakshmi Niwas tv serial actress
'लक्ष्मी निवास' मालिकेत नवं काय घडणार? Instagram
Published on
Updated on

मुंबई : 'लक्ष्मी निवास' मालिकेत देवीचा उत्सव साजरा होत आहे. दळवी, गाडे पाटील आणि इतर कुटूंब या उत्सवात सहभागी झाली आहेत. उत्सवादरम्यान विश्वा-जान्हवी, विश्वा-जयंत आणि सई-जान्हवी यांच्यातील संवादातून अनेक उलगडे होणार आहेत. एकीकडे हे सगळं घडत असताना वेंकी आणि आरतीमध्ये प्रेमाचं नातं बहरताना दिसतंय. सिद्धूला भावना विषयीच्या त्याच्या भावना सतावत आहेत आणि म्हणून तो देवीसमोर आपली खरी ओळख उघड करण्याचा निर्णय घेतो. तो जशी ह्याबद्दल कबुली देणार इतक्यात देवीच्या मूर्तीवरील मंगळसूत्र खाली पडत आणि सिद्धू ते अलगद पकडतो आणि त्याच क्षणी ठरवतो की काहीही झालं तरी तो हे मंगळसूत्र भावनाच्या गळ्यात घालेल.

image of Lakshmi Niwas tv serial actress
Instagram

इकडे प्रसाद वितरणाच्या वेळी लक्ष्मीचा भाऊ दिग्विजय लक्ष्मीला प्रसाद द्यायला नकार देतो. तो तिचा आणि श्रीनिवासचा अपमान करून तो रिक्षा चालक आहे हे बोलून दाखवणार आहे. लक्ष्मी श्रीनिवासच्या मागे ठामपणे उभी राहत कोणतीही नोकरी लाजिरवाणी नसल्याचे स्पष्ट करत तिला आपल्या नवऱ्याचा अभिमान आहे असल्याचं ठामपणे सांगते. भावनाच्या नकळत तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं गेलय. कोणी घातलंय तिच्या गळ्यात हे मंगळसूत्र? हा विचार तिला आतून अस्वस्थ करतोय. ती स्वतःला वचन देते की जोपर्यंत जबाबदार व्यक्ती पुढे येत नाही, तोपर्यंत ती मंगळसूत्र काढणार नाही. घरात सर्वांना जेव्हा भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र असल्याचं कळणार आहे तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसणार आहे.

image of Lakshmi Niwas tv serial actress
सोशल मीडिया फॉलोअर्सच्या हव्यासाने घेतला मिशाचा जीव?... मिशा अगरवालच्या मृत्यूनंतर बहिणीच्या पोस्टने उडाली खळबळ
image of Lakshmi Niwas tv serial actress
Instagram

आता सिद्धू सर्वांसमोर येऊन सत्य उलगडेल? भावनाला हे सत्य कळल्यावर तिचा काय निर्णय असेल? वेंकी आणि आरती मध्ये बहारतंय प्रेमाचं नातं! हे आणि असे अनेक खुलासे या महामुहुर्ताच्या निमित्ताने होणार आहेत. त्यामुळे हा महमुहूर्त बिलकुल चुकवू नका. 'लक्ष्मी निवास' दररोज रात्री ८ वा फक्त आपल्या झी मराठीवर.

image of Lakshmi Niwas tv serial actress
Housefull 5 Teaser | अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल ५' चा दणक्यात टीजर रिलीज, १८ स्टार्सचा टोटल धमाका!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news