

Tejashree Pradhan Marriage: मराठी मनोरंजन क्षेत्रातील आघाडीची अभिनेत्री तेजश्री प्रधान ही तिच्या अभिनयासाठी आणि दिलखुलास हास्यासाठी प्रसिद्ध आहे. टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहचलेल्या तेजश्रीच्या दिलखुलास हास्याचे महाराष्ट्रात अनेक चाहते आहेत. मात्र वैयक्तिक आयुष्यात अनेक आव्हानांना सामोरे गेलेली तेजश्री आता आयुष्यात सेटल होण्याचा विचार करत आहे. ती पुन्हा एकदा प्रेमात पडण्यास देखील तयार आहे.
नुकतेच सिने तडका २.० च्या कव्हर पेजवर आली तेजश्री प्रधानने सिने तडकाला मुलाखत दिली आहे. त्याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रमोमध्ये तेजश्री प्रधानने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली आहेत. मात्र तुला लोनली वाटतं का या प्रश्नावर तेजश्री प्रधानने उत्तर देणं टाळलं. मात्र तिचा चेहराच सर्वकाही सांगून गेला.
अँकरने तेजश्री प्रधानला आताची अन् १० वर्षापूर्वीची तेजश्री यामध्ये काय फरक झाला असा प्रश्न विचारला होता. याचे उत्तर आता सविस्तर मुलाखतीतूनच मिळेल. मात्र अँकरने तेजश्रीला तुला असं वाटतं का की तू पुन्हा प्रेमात पडू शकतेस का असा प्रश्न विचारल्यावर तेजश्रीने नक्कीच मला प्रेमात पडायला आवडेल असं उत्तर दिलं.
हाच प्रश्न पुढे नेत अँकरने तुला आता सेटल व्हावसं वाटत नाही का असं खोचकरित्या विचारलं. त्यावेळी तिने का नाही नक्कीच मला सेटल्ड व्हायला आवडेल असं आश्वासक उत्तर दिलं. मात्र त्यानंतर तिला तुला कधी एकाकी असल्यासारखं वाटतं का असा पुढचा प्रश्न विचारला त्यावेळी तिने त्याचे उत्तर देणं टाळलं. मात्र तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहूनच चाहत्यांना याचं उत्तर मिळालं.
तेजश्रीला तिच्या कामाबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आले होते. तुला एका पाठोपाठ एक मराठी मालिका कशा काय मिळतात असं विचारल्यावर देवाची कृपा आहे माझी तिथं चांगली लॉबिंग असल्यामुळं मला एका पाठोपाठ एक कामं मिळत राहतात असं उत्तर दिलं.
विशेष म्हणजे तेजश्री सिने तडकाच्या कव्हर पेजवर झळकली असून तिची विस्तृत मुलाखत लकरच रिलीज होणार आहे. तेजश्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर अभिनेता शशांक केतकर सोबत तिचे २०१४ मध्ये लग्न झालं होतं. या दोघांनी एकत्र मालिकेत काम केलं होतं. तिथूनच त्यांच्या नात्याला सुरूवात झाली होती. मात्र हे नातं अल्पायुशी ठरलं. २०१५ मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. तेव्हापासून तेजश्री सिंगलच आहे.