Ashwini Kulkarni: मराठी सिनेसृष्टीतही 'कंपू', कास्टिंग काऊचबद्दलही मराठी अभिनेत्रीचा गौप्यस्फोट
वरण भात लोणचं कोण नाय कोणाचं या सिनेमातील हटके भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर आलेली अभिनेत्री म्हणजे अश्विनी कुलकर्णी. याशिवाय पछाडलेला, एक डाव भुताचा, ती फुलराणी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अलीकडेच एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने कास्टिंग काउच सहित मराठी अभिनेत्री आणि त्यांचा वावर याबाबत परखड मत मांडले.
मराठी सिनेसृष्टीत फेवर करणे हा सगळ्यात मोठा दोष आहे. मराठी इंडस्ट्री फेवेरिझमवरच चालू आहे हे माझे स्पष्ट मत आहे. तुम्ही अमुक एका दिग्दर्शकाकडे मी काम केले तर इथले लोक मला लगेच त्याच्या कंपूतील म्हणून पाहायला लागतात. खरे तर अनेकदा या दिग्दर्शकाचा माझा संवाद त्या सिनेमापुरताच असतो. तरीही अनेकदा केवळ फेवेरिझममध्ये आहे म्हणूनही एखाद्या व्यक्तिरेखेसाठी मिसकास्ट केले जाते.
मराठी सिनेसृष्टीत कंपू आहेत. सुदैवाने मी त्या एकाही कंपूचा भाग नाही. त्यामुळेच माझेही असे अनेक दिग्दर्शक मित्र आहेत जे अगदी नेहमीच्या गप्पांमध्ये असतात. पण जेव्हा प्रोजेक्ट सुरू करतात तेव्हा मात्र मी कुठेच नसते. पण मी इंडस्ट्रीमध्ये काम करायला आले आहे, मैत्री नाही त्यामुळे मी फेवरगेम पासून लांब असते.
सगळ्याच इंडस्ट्रीप्रमाणे मराठीतही कास्टिंग काउच आहे. खरे तर जवळपास प्रत्येक अभिनेत्री या मानसिक संघर्षातून जात असते. कास्टिंग काउचच्या सूचक मेसेजना कसं रीप्लाय केला जातो यावर बरेचदा त्या अभिनेत्रीचे करियर कसे होणार हे अवलंबून असते.

