नेहा जोशीच्या ‘सापळा’ चित्रपटाचा टीझर प्रकाशित

सापळा चित्रपट
सापळा चित्रपट
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, राजवारसा प्रॉडक्शन्स आणि मुळाक्षर प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित 'सापळा' चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा आगामी मराठी चित्रपट २६ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून आहे.

संबंधित बातम्या –

या टीझरची झलक चित्रपटाचा पोत स्पष्ट करते. ही एक खिळवून ठेवणारी आणि तेवढीच उत्कंठा वाढवणारी कथा आहे, हे यातून पुढे येते. "रक्ताचा वास येतोय," असा संवाद यातील एका महिला पत्राच्या तोंडी आहे. दुसऱ्या एका दृश्यात दोन पुरुष पात्रे एका दूरच्या ठिकाणच्या एका खुनाचा संदर्भ देतात. त्यातून ही एक 'मर्डर मिस्ट्री' असावी का, अशी शंका पाहणाऱ्याच्या मनात येते. हा टीझर प्रेक्षकांची उत्कंठा वाढवतो.

चित्रपटाचे पोस्टर दोन आठवड्यांपूर्वी एका शानदार समारंभात प्रकाशित करण्यात आले. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, समीर धर्माधिकारी, दीप्ती केतकर, नेहा जोशी यांच्या भूमिका आहेत. निखिल लांजेकर दिग्दर्शित 'सापळा'ची कथा पटकथा संवाद- श्रीनिवास भणगे यांचे आहेत. चित्रपटाची निर्मिती प्रद्योत प्रशांत पेंढरकर, अनिल नारायणराव वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर यांची आहे.

या टीझरबद्दल बोलताना दिग्दर्शक निखिल लांजेकर म्हणाले, "सापाळाचा हा टीझर आमच्या चित्रपटाची एक झलक देवून जातो. अधिक काही सांगण्यापेक्षा प्रेक्षक हा टीझर आणि पुढे येणारे ट्रेलर पाहून आपसूक चित्रपटगृहाकडे वळतील अशी आमची खात्री आहे."

चित्रपटाच्या निर्मितीबाबत बोलताना लांजेकर म्हणाले, "मला गूढकथा नेहमीच आवडत आल्या आहेत. अशा प्रकारच्या कथा या प्रेक्षकांना नेहमीच अत्यंत प्रभावीपणे भूरळ घालतात. एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून उत्तम कथेच्या शोधात असताना प्रख्यात कथालेखक श्री श्रीनिवास भणगे यांची एक अत्यंत प्रभावी आणि जुनी नाट्यसंहिता वाचनात आली. आपल्या मराठी साहित्याची भव्य कक्षा ही आश्चर्यचकित करणारी आहे. ही कथा आजच्या तंत्रज्ञानाची जोड देत मोठ्या पडद्यावर आणण्याचा मोह मी आवरू शकलो नाही."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news