

बिग बॉस 19च्या घरात वाइल्ड कार्ड एंट्री झाल्यापासूनच चर्चेत असलेली व्यक्ती म्हणजे मालती चहर. तिचे अमालसोबत अफेअर असल्याची चर्चा शांत होते न होते तोच आता पुन्हा एकदा मालती चर्चेत आली आहे. मालतीचा एक जुना व्हीडियो व्हायरल होतो आहे. यामध्ये मालती कपिल शर्मा शोमध्ये दिसते आहे. या शोमध्ये ती क्रिकेटर भाऊ दीपक चहरसोबत आली होती. यामध्ये मालती ती अगदीच साधी दिसते आहे. (Latest Entertainment News)
यावेळी शोमध्ये कपिल शर्मा दीपकला विचारतो की 'दीपक तसा तर तू अविवाहित आहेस. पण कोणत्या बॉलीवुड अभिनेत्रीसाठी तुझ्या मनात जागा आहे?’ दीपक म्हणतो, कुणावर नजर नाही. माझी बहीण मालती आली आहे या शोमध्ये. हे तिचे काम आहे. ती इंडस्ट्रीमध्ये काम करते. त्यामुळे मला दाखवत असते ही मुलगी कशी आहे? ती कशी आहे. यानंतर कपिल मालतीला विचारतो, त्यावर ती म्हणते, सुंदर आणि सुशील.
यावर कपिल विचारतो, कोणत्या क्षेत्रात करियर करणारी असावी? मालती म्हणते असे काही विशेष नाही कोणत्याही क्षेत्रातील चालेल.’ यावर कपिल म्हणतो, बरे झाले. मालती तुझ्यासाठी कोणीतरी शोधते आहे म्हणजे नणंद भाऊजांमध्ये भांडण होणार नाही.
हा व्हीडियो व्हायरल होताच नेटीझन्स म्हणतात, ‘म्हणजे प्रत्येक ठिकाणी हिला भाऊ प्रमोट करतो आहे. तरीही काही काम मिळत नाही हिला. बिग बॉसमध्ये आल्यावर हिचे खरे रूप समोर आले आहे. पुढे यूजर म्हणतात, स्वत: तर काही मोठे काम केले नाही. चालली आहे तान्या, फरहानासारख्या सेल्फ मेड मुलींना जज करायला.