

मल्याळम चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक रंजित यांना एका अभिनेत्रीने केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अटक केली आहे. पीडित अभिनेत्रीने आरोप केला आहे की, एका चित्रपटाच्या शुटींग दरम्यान व्हॅनिटी व्हॅनमध्ये रंजित यांनी तिचे लैंगिक शोषण केले होते. न्यायालयाने रंजित यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
sexual assault case - malayalam director ranjith
मल्याळम चित्रपटसृष्टीतील (Mollywood) ज्येष्ठ आणि दिग्गज दिग्दर्शक रंजित यांच्या अटकेमुळे संपूर्ण दक्षिण भारतीय सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. एका बंगाली अभिनेत्रीने रंजित यांच्यावर केलेल्या लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी त्यांना थोडुपुझातून मंगळवारी रात्री ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गुपचुप पद्धतीने करण्यात आल्याचे समोर आलेय. एर्नाकुलम सेंट्रल पोलिसांनी थोडुपुझा स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केलीय.
मीडिया रिपोर्टनुसार, रंजित हे एका नियोजित कार्यक्रमासाठी थोडुपुझातून जात होते. तेव्हा रस्त्यात त्यांना थांबवण्यात आलं. सार्वजनिक शांतता भंग होऊ नये म्हणून इडुक्कीचे एसपी यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. सुरुवातीला थोडुपुझा पोलिस ठाण्यात नेण्यात आले. पुढील चौकशीसाठी त्यांना एर्नाकुलम सेंट्रल पोलिसांकडे सोपवण्यात आलं.
निर्माणाधीन चित्रपट सेटवर घटना
पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना एक निर्माणाधीन चित्रपटाच्या सेटवर झाली होती. अभिनेत्रीने आरोप केला की, चित्रपटाचे शूटिंग दरम्यान दिग्दर्शक रंजीत यांनी तिच्यासोबत गैरवर्तन आणि लैंगिक शोषण केलं. पीडित अभिनेत्रीने पोलिसांकडे थेट तक्रार दिली नव्हती. तिने Internal Complaints Committee - ICC कडे औपचारिक तक्रार दिली होती. या समितीने गंभीरपणे घेत केरळ पोलिसांकडे केस सोपवण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, अभिनेत्रीने आरोप केला की, रंजीत यांनी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तिला एका व्हॅनिटीमध्ये बोलावून लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला.
रंजीत यांची प्रकृती बिघडली?
एका रिपोर्टनुसार, अटकेनंतर रात्री रंजीत यांची प्रकृती बिघडली.