

Kalabhavan Navas Death
मल्याळम अभिनेते आणि प्रसिद्ध मिमिक्री कलाकार कलाभवन नवास यांचे सायंकाळी संध्याकाळी (१ ऑगस्ट) रोजी निधन झाले. ते कोचीमधील एर्नाकुलम येथील चोट्टानिकारा येथील हॉटेलमध्ये मृतावस्थेत अवस्थेत आढळून आले. ते ५१ वर्षाचे होते.
पीटीआय वृत्तसंस्थेने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, कलाभवन हे चित्रपटाच्या शूटिंगनंतर हॉटेलमध्ये थांबले होते. पण ते हॉटेलच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यांचे पोस्टमार्टम आज होणार असून त्यानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
'प्रकम्बनम' चित्रपटाचे शुटिंग संपवून ते सायंकाळी हॉटेलमध्ये गेले होते. ते बराच वेळ हॉटेलमधील खोलीतून बाहेर आले नाहीत. त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्याच्या खोलीत जाऊन पाहिले असता ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले.
त्याच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते संध्याकाळी ५:३० वाजता शुटिंग संपवून गेले तेव्हा ते पूर्णपणे ठीक होते. त्यांनी सांगितले की ते घरी जात आहेत. कारण त्यांना शूटिंगमधून दोन दिवसांची सुट्टी मिळाली होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांच्या खोलीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. कलाभवन यांच्या आकस्मिक निधनाबद्दल केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी दुःख व्यक्त केले आहे.