

Mahavatar Narsimha Trailer out
मुंबई - क्लीम प्रोडक्शन् निर्मित आणि होम्बळे फिल्म्स प्रस्तुत, 'महावतार नरसिंह' हा चित्रपट प्रेक्षकांना एक अद्वितीय सिने अनुभव देण्यास सज्ज झाला आहे. आपल्या भव्यतेने, प्रभावी कथनशैलीने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.
या ट्रेलरद्वारे प्रेक्षकांना भारतीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण अध्याय पाहायला मिळतो. ही कथा आहे भक्त प्रह्लादाची, जो भगवान विष्णूचा निष्ठावान भक्त असतो. ट्रेलरमध्ये गूजबंप्स देणारा पार्श्वसंगीत, अत्युच्च दर्जाचे व्हिज्युअल्स आणि नाट्यमयता अनुभवायला मिळते. अशा भव्यतेने सादर झालेला 'नरसिंह अवतार' आजवर कधीही रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाला नव्हता. याचबरोबर, क्लीम प्रोडक्शन्स आणि होम्बळे फिल्म्सने 'महावतार सिनेमा युनिव्हर्स' या दशकभर चालणाऱ्या ऍनिमेटेड फ्रँचायझीची घोषणा केली आहे. या मालिकेमध्ये भगवान विष्णूच्या दहा अवतारांची कथा सादर केली जाणार आहे.
'महावतार नरसिंह' चे दिग्दर्शन केले आहे. अश्विन कुमार यांनी, आणि निर्मिती केली आहे शिल्पा धवन, कुशल देसाई आणि चैतन्य देसाई यांनी, क्लीम प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली. होम्बळे फिल्म्स, त्यांच्या दर्जेदार कथाविषयक कामासाठी प्रसिद्ध, यांनी हा चित्रपट सादर केला आहे. या चित्रपटाची खासियत म्हणजे याचे 3D मध्ये सादरीकरण आणि एकाच वेळी पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शन. 'महावतार नरसिंह' २५ जुलै, २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.