

पुढारी ऑनलाईन डेस्क - सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोने गेल्या काही महिन्यांपासून ब्रेक घेतला होता. त्यामुळे प्रेक्षक हा शो पुन्हा कधी सुरू होईल याची आतुरतेने वाट पाहत होते. याच संदर्भात मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर प्रसारित केला होता. कार्यक्रमाची सूत्रसंचालक अभिनेत्री प्राजक्ता माळीने देखील सोशल मीडियावर हास्यजत्रेच्या सेटवरील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओने हास्यरसिकांचं लक्ष वेधलं आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'We Are Back!' असं म्हणत व्हिडिओमधून तिने नव्या सीझनच्या शूटिंगला सुरूवात झाल्याची माहिती दिली आहे. या व्हिडिओमध्ये हास्यजत्रेतील कलाकार तसेच शोमध्ये असणारे प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर दिसत आहेत. येत्या २ डिसेंबरपासून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, असं म्हणत तिने हा व्हिडिओ शूट केल्याचा पाहायला मिळतोय. आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आठवड्यातील तीन दिवस प्रेक्षकांना पाहता येणार असल्याचं सांगताना दिसत आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा’ - कॉमेडीची हॅटट्रिक!” २ डिसेंबरपासून पुन्हा सुरुवात होणार आहे. सोमवार ते बुधवार रात्री ९:३० वाजता हा कार्यक्रम पाहता येईल.