Kon Honaar Crorepati | 'नमस्कार खानदेशकर, कसा अशेत? बरा अशेत का?’; माधुरी दीक्षितचा खान्देशी लहेजा

Kon Honaar Crorepati Season | 'नमस्कार खानदेशकर, कसा अशेत? बरा अशेत का?’; माधुरी दीक्षितचा खान्देशी लहेजा
sandeep bhamre- Madhuri Dixit
Madhuri Dixit Kon Honaar Crorepati Khandeshi dialect
Published on: 
Updated on: 

रिॲलिटी शो 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर एक अतिशय भावुक प्रसंग पाहायला मिळाला. धुळे जिल्ह्यातील स्पर्धक संदीप भामरे जेव्हा हॉट सीटवर बसला आणि थेट त्याने तिला खान्देशात येण्याचं आमंत्रण दिलं. संदीप हा सामान्य कुटुंबातील तरुण आहे. तो ‘बॉलिवूड क्वीन’ माधुरी दीक्षित समोर हॉट सीटवर बसला. खान्देशासाठी ही अभिमानाची गोष्ट तर ठरली. पण यात एक ट्विस्ट आला, जेव्हा संदीपने माधुरीला खान्देशी लहेजात बोलण्याची विनंती केली.

सोनी मराठीचा शो कोण होणार करोडपतीमध्ये ट्विस्ट आला, जेव्हा संदीपने आग्रह केल्यानंतर खुद्द माधुरीने अस्सल खान्देशी भाषेत एक वाक्य म्हटले. या संवादाने उपस्थितांची आणि खान्देशकरांची मने जिंकली.

हॉट सीटवर बसलेल्या संदीपनं माधुरीला खान्देशी भाषेत बोलण्याचा आग्रह केला. त्यावेळी माधुरीनेही होकार देत कसं बोलायचं हे जाणून घेतलं. "नमस्कार खानदेशकर, कसा अशेत? बरा अशेत का?" असा संवाद माधुरीने म्हणताच सेटवर टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी माधुरी म्हणाली की, "या भाषेमध्ये एक वेगळीच गोडी आणि आपुलकी आहे."

भारवला संदीप भामरे

अभिनेत्री माधुरीचा हा अंदाज पाहून संदीप भारावला. त्याने तिला थेट खान्देशात येण्याचं आमंत्रण दिलं. "तुम्ही एकदा खानदेशात या. मी तुम्हाला गरमागरम बाजरीची भाकरी आणि चमचमीत ठेचा खाऊ घालेन, तुमचा आत्मा तृप्त होईल." यावेळी संदीपने मंचावर ठेचा बनवण्याची पारंपरिक रेसिपी सांगितली. यावर माधुरी म्हणाली की, "मला देखील भाकरी खूप आवडते. आमच्या घरी पोळीपेक्षा बऱ्याचदा भाकऱ्याच जास्त बनवल्या जातात."

'तेव्हा कुठे एवढे पैसे हातात येतात....'

या खेळात पुढे जात संदीपने २५ हजार रुपयांचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. तो भावूक जाला आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले. संदीप म्हणाला, "मॅडम, ही माझ्या आयुष्यातील पहिली कमाई आहे. २५ हजार रुपये ही आमच्या घरातील तब्बल ७ जणांची मिळून संपूर्ण महिन्याची कमाई असते. आम्ही सगळे जण जेव्हा महिनाभर अतोनात कष्ट करतो, तेव्हा कुठे एवढे पैसे हातात येतात."

पण संदीपचे हे बोलणे ऐकून सेटवर काही काळ शांतता पसरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news