पुढारी ऑनलाईन; बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या 'लकी' चित्रपटातील अभिनेत्री स्नेहा उल्लाल ( sneha ullal ) हिची तुलना त्या काळी अभिनेत्री ऐश्वर्या रॉयशी तुलना केली गेली. स्नेहा उल्लाल हिने 'लकी' चित्रपटातून पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्या काळी सलमान खानची हिरोईन असे तिला म्हटलं जात होतं.
स्नेहा उल्लालला ( sneha ullal ) बॉलिवूडमध्ये अपेक्षित यश मिळवता आले नाही. पण ती नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून अपडेटस देत असते. स्नेहाने बॉलिवूडसोबतच साऊथ चित्रपटातही काम केले आहे. सध्या तिने आपले हॉट फोटो शेअर केले आहे.
स्नेहाने २००५ मध्ये 'लकी-नो टाईम फॉर लव्ह' या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटाद्वारे सलमानने तिला बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. त्यानंतर स्नेहा उल्लालची तुलना ऐश्वर्या रॉयशी करण्यात आली. तेव्हा ती फक्त १८ वर्षांची होती. स्नेहा ही सलमानची बहीण अर्पिताची एक चांगली मैत्रीण आहे. या ओळखीतून ती सलमानच्या संपर्कात आली. स्नेहाने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉयशी तुलना करणे हा पीआर स्ट्रॅटेजीचा एक भाग होता.
लकीनंतर स्नेहाने 'आर्यन', 'जाने भी दो यारों' आणि 'क्लिक' यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले, पण हे चित्रपट फ्लॉप झाले. 'बेजूबान' चित्रपटानंतर स्नेहाने बॉलिवूडला रामराम ठोकला. शेवटची ती 'एक्सपायरी डेट' या वेबसीरिजमध्ये झळकली होती.
यानंतर काही काळानंतर स्नेहाने सोशल मीडियावरून ब्लड संबंधित एका आजाराशी लढा देत असल्याचे सांगितले. या आजारादरम्यान चार वर्षाहून अधिक स्वत: च्या पायावर उभे राहणे कठीण झाले असल्याचे तिने म्हटले होते. सध्या स्नेहा यातून पुर्णपणे बरी झाली आहे.
प्रदीर्घ गॅपनंतर स्नेहाला बॉलिवूडमध्ये पुन्हा पुनरागमन करायचे आहे. या दरम्यान तिने यावेळी सलमानची मदत न घेता स्वत:च आपले करिअर करण्याचे ठरविले आहे.
हेही वाचलंत का?