The girl with the golden legs म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'या' मॉडेलला 'Period Tampon' वापरल्याने कापावे लागले पाय, किती फायदेशीर अन्‌ धोकादायक?

Lauren Wasser The girl with the golden legs म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'या' मॉडेलला 'Period Tampon' वापरल्याने कापावे लागले पाय, किती फायदेशीर अन्‌ धोकादायक?
Lauren Wasser
he girl with the golden legs Lauren Wasserpudhari photo
Published on
Updated on

Period Tampon Model Loss legs Benefits and loss

लॉरेन वासर (Lauren Wasser) ही एक मॉडेल आहे, जी The girl with the golden legs (सोन्याच्या पायांची मुलगी) म्हणून ओळखली जाते. २०१२ मध्ये, टॅम्पॉन वापरल्यामुळे तिला टॉक्सिक शॉक सिंड्रोम (TSS) झाला, ज्यामुळे तिचे अनेक अवयव निकामी झाले आणि तिचा उजवा पाय कापावा लागला होता. त्यानंतर इन्फेक्शन झाल्याने तिचा डावा पायही कापावा लागला.

मेट गाला २०२६ च्या व्यासपीठावर जेव्हा ती गोल्डन सूट घालून उतरली, तेव्हा तिच्या गोल्डन लेग्ज आणि फॅशन सेन्समुळे पुन्ही ती चर्चेत आली. The girl with the golden legs अशा आशयाखाली तिच्याबद्दल बरेच लिहिण्यात आले.

Lauren Wasser
Suriya Mass Hero | दाक्षिणात्य सूर्याचा सुपरस्टार 'मास स्ट्रोक', 'गजनी,' 'सिंघम,' 'जय भीम' अन्‌ आता 'करुप्पु'..

कोण आहे लॉरेन वासर?

लॉरेन वासर (Lauren Wasser) ही एक प्रसिद्ध अमेरिकन मॉडेल आहे. ऑक्टोबर २०१२ मध्ये, वयाच्या २४ व्या वर्षी तिला 'टॉक्सिक शॉक सिंड्रोम' (TSS) नावाचा अत्यंत दुर्मिळ आजार झाला, जो टॅम्पॉन चुकीच्या पद्धतीने वापरला होता. तिने खूप वेळ टॅम्पॉन न बदलल्यामुळे संसर्ग झाला. तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना तिला तिचे दोन्ही पाय कापावे लागले होते. या गंभीर परिस्थितीनंतरही तिने हार मानली नाही. तिचे दोन्ही पाय गमावल्यानंतर तिने कृत्रिम पायांसह (prosthetic legs) पुन्हा मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले. अनेक मोठ्या ब्रँड्ससाठी तिने रॅम्प वॉक केले. जागतिक स्तरावर नव्याने ओळख निर्माण करणाऱ्या या मॉडेलने एक चूक केली होती, जी टॅम्पॉनच्या वापरासंदर्भात होती.

मॉडेल लॉरेन वासरला ऑक्टोबर २०१२ मध्ये जेव्हा मासिक पाळी आली होती, तेव्हा तिला फ्लू सारखी लक्षणे दिसू लागली. काही दिवसांतच, ती तिच्या अपार्टमेंटमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला १०७ डिग्री ताप, सेप्टिक शॉक आणि टॅम्पॉनमुळे झालेल्या टॉक्सिक शॉक सिंड्रोममुळे (TSS) अनेक हृदयविकाराचे झटके आले होते. पण गँगरीन झाल्यामुळे तिला उजवा पाय कापावा लागला. पण इतकेच नाही तर तिला अनेक वर्षे वेदना सहन करायला लागल्या. ज्यामुळे जानेवारी २०१८ मध्ये, तिने आपला डावा पाय देखील कापून टाकण्याचा धाडसी निर्णय घेतला.

मॉडेलिंगच्या पलीकडे जाऊन तिने आपले जीवन महिलांच्या आरोग्यासाठी समर्पित केले आहे. तथापि, पिरीयड टॅम्पॉन वापरणे किती फायदेशीर आणि किती धोकादायक आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

मासिक पाळीच्या काळात कापूस किंवा रेयॉनपासून बनवलेला टॅम्पॉन (Tampon) वापरला जातो. हे पॅड्सपेक्षा अधिक सुटसुटीत असतात. टॅम्पॉन वापरण्याचे अनेक फायदे आहेत, मात्र काही तोटे आणि धोकेही आहेत.

टॅम्पॉन वापरण्याचे फायदे -

- टॅम्पॉन वापरताना पोहणे, व्यायाम करणे किंवा धावणे यासारख्या शारीरिक हालचाली करणे अत्यंत सोपे आणि आरामात जाते.

- हे शरीराच्या आत असल्यामुळे पॅड्ससारखे जाड वाटत नाहीत आणि घट्ट कपड्यांवरून अजिबात दिसत नाहीत

- रक्ताचा हवेसोबत संपर्क येत नसल्यामुळे दुर्गंधीचा त्रास होत नाही.

- टॅम्पॉन आकाराने अतिशय लहान असतात, त्यामुळे ते पर्समध्ये किंवा प्रवासात बाळगणे सोपे जाते

Lauren Wasser
Movie Raja Shivaji Box Office |'राजा शिवाजी' चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा! ३ आठवडे पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर, सर्वांच्या नजरा नव्या विक्रमाकडे!

टॅम्पॉन वापरण्याचे तोटे आणि धोके

- टॉक्सिक शॉक सिंड्रोम (TSS): टॅम्पॉन जास्त वेळ ठेवल्यास दुर्मिळ परंतु जीवघेणा 'टॉक्सिक शॉक सिंड्रोम' (TSS) नावाचा संसर्ग होण्याचा धोका असतो.

- वारंवार बदलणे: पॅड्सच्या तुलनेत टॅम्पॉन लवकर भरतात आणि ते दर ४ ते ६ तासांनी बदलणे बंधनकारक असते

- टॅम्पॉनमुळे कोरडेपणा, जळजळ होऊ शकते

- संसर्ग टाळण्यासाठी टॅम्पॉन घालण्यापूर्वी आणि काढल्यानंतर हात नेहमी साबणाने स्वच्छ धुवावेत

- नेहमी तुमच्या पिरीयड फ्लोनुसार त्या क्षमतेचा टॅम्पॉन निवडावा

- कधीही एकाच टॅम्पॉनचा वापर सलग ६ ते ८ तासांपेक्षा जास्त वेळ करू नका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news