Dashavatar Box Office Collection | “२५ शहरं, १०० स्क्रीन्स आणि हाऊसफुल्ल शोज! “दशावतार”, तुम्ही पाहिलात का?

“दशावतार” गोष्ट निसर्ग रक्षणाची, तुम्ही पाहिलात का?
image of film Dashavatar
Dashavatar day 15 Box Office Collection Instagram
Published on
Updated on

Dashavatar Box Office Collection day 15

मुंबई - अमेरिकेतील २५ पेक्षा जास्त शहरात जवळपास १०० स्क्रीन्सवर ‘दशावतार’ने आपली रुंजी घातलीय. सुबोध खानोलकर लिखित दिग्दर्शित 'दशावतार’ला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाची गोष्ट निसर्ग रक्षणाशी संबंधित आहे. मानवी जीवन आणि पर्यावरणातील नातं, आधुनिकतेच्या नावाखाली होणारी निसर्गाची हानी आणि त्यावर उपाय यांचा प्रभावी वेध या चित्रपटात घेतला आहे. त्यामुळे केवळ मनोरंजनापुरताच नाही, तर सामाजिक जाणीवा निर्माण करणारा चित्रपट म्हणूनही ‘दशावतार’कडे पाहिलं जातंय.

कलाकारांचा प्रभावी अभिनय

यात दिलीप प्रभावळकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, आरती वडगबाळकर, महेश मांजरेकर, रवी काळे, लोकेश मित्तल, अभिनय बेर्डे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

image of film Dashavatar
TMKOC: टीव्हीचा धुरंधर 'जेठालाल'ची गरबा नाईटमध्ये हवा, दिव्यांका त्रिपाठीसह टीव्ही स्टार्सचा डान्स व्हायरल

पहिल्याच आठवड्यात हाऊसफुल्ल शोजने धमाकेदार सुरुवात केलेल्या या चित्रपटाचा उत्साह अद्यापही कमी झालेला नाही. उलट दिवसेंदिवस वाढतच आहे. बॉक्स ऑफिसवर भरभरून कमाई करत असलेला हा चित्रपट केवळ कथेमुळेच नाही, तर प्रभावी मांडणी, दमदार कलाकारांचा अभिनय आणि आपल्या संस्कृतीशी जोडणाऱ्या कहाणीमुळे चर्चेत आहे.

बॉक्स ऑफिस कलेक्शन

दशावतारने १५ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर भारतात १८.४५ कोटींची कमाई केली. पाहा चार्ट-

कोकणातून मोठा प्रतिसाद

झी स्टुडिओजची प्रस्तुती असलेल्या चित्रपटाला कोकणात चांगले यश मिळाले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी, पेण, कणकवली, महाड, चिपळूण या सर्व भागातील प्रत्येक थिएटरमध्ये हा चित्रपट पाहता येतोय.

image of film Dashavatar
Ameesha Patel | 'हे' बोलण्याआधी १०० वेळा विचार करतील मुली! अमीषा म्हणाली..'तर मी One Night Stand देखील...'

झी स्टुडिओजची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांचे असून त्यांच्यासह सुजय हांडे, ओंकार काटे, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे आणि विनायक जोशी चित्रपटाचे निर्माते आहेत. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news