

Ameesha Patel revealed Hollywood superstar crush
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल नेहमीच तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे आणि बोल्ड विधानांमुळे चर्चेत राहते. आताही तिने असे काही विधान केले आहे की, ते बोलताना १०० वेळा विचार करावा लागेल. नुकतीच तिने दिलेल्या एका कबुलीमुळे पुन्हा एकदा तिचं नाव चर्चेत आहे. एका मुलाखतीदरम्यान अमीषाने एक धक्कादायक वक्तव्य केले.
पन्नास वर्षांची अमीषा असं काही बोलली की, तिची आता चर्चा होताना दिसतेय. एका पॉडकास्टमध्ये क्रश, प्रेम आणि वन नाईट स्टँड विषयी उघडपणे सांगितले. अमीषा म्हणाली की, असा एक अभिनेता आहे, ज्याच्या प्रेमात ती वेडी आहे आणि काहीही करू शकते..आपल्या सर्व मर्यादा तोडू शकते.
तिला पॉडकास्टमध्ये विचारण्यात आलं की, तुझा सेलिब्रिटी क्रश कोण आहे? तर तिने बिनधास्त हॉलीवूड सुपरस्टार टॉम क्रूजचे नाव घेतलं.
ती म्हणाली, 'मला टॉम क्रूजवर क्रश आहे. जर तुम्ही त्यांच्यासोबत पॉडकास्ट करू शकता तर, मला नक्की बोलवा. मला बालपणापासून टॉम क्रूज आवडतो. माझ्या पेन्सिल बॉक्स, फाईल्सवर त्यांचे फोटो नेहमी असायचे. माझ्या रुममध्ये देखील टॉम क्रूजचे पोस्टर होते. मी नेहमी मजेत म्हणते की, तो एकमेव असा व्यक्ती आहे, ज्याच्यासाठी मी माझ्या सर्व मर्यादा पार करू शकते. मी त्याच्यासाठी काहीही करू शकते. जर तुम्ही मला विचाराल की, मी वन-नाईट स्टँड करू शकते का, तर हो, मी करू शकते.'
तिच्या या वक्तव्याने चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडाली आहे. अनेकांनी तिच्या या बोलण्याला “बोल्ड पण प्रामाणिक” म्हणत समर्थन दिलं तर काहींनी त्यावर टीकाही केली.
अमीषा पटेलने 'कहो ना प्यार है' या हृतिक रोशनसोबतच्या डेब्यू चित्रपटामुळे प्रचंड लोकप्रिय झाली. त्यानंतर 'गदर: एक प्रेम कथा' या सुपरहिट सिनेमामुळे तिने संपूर्ण देशात आपली छाप सोडली. हमराज, भूलभुलैया हिट चित्रपट दिल्यानंतर ती गदर २ मध्ये सकीनाची भूमिका करून पुन्हा चर्चेत आली.