पुढारी ऑनलाईन डेस्क - 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत तुळजाच्या लग्नाची लगबग सुरु आहे. मांडव घातला जातोय, पण तुळजाला हे लग्न करायचं नाहीये. सुर्या तिचं आणि सिद्धार्थचं बोलणं करून देतो आणि पुन्हा एकदा तुळजाला वचन देतो की तुझं लग्न मी सिद्धार्थ सोबतच लावून देईन. हे सगळं भाग्यश्री हे ऐकते.
भाग्यश्री हे तेजू, धनु आणि राजु ला सांगण्याचा प्रयत्न करते. दुसरीकडे तुळजाचा मेहंदी समारंभ सुरु आहे. सगळं वऱ्हाड रिसॉर्टवर जाण्यासाठी निघतं, जिथे तुळजा आणि सत्यजितचा लग्न समारंभ पार पडणार आहे. गावातून चक्क दोन बस भरून व्हराडी निघतात. सूर्याला आपल्या प्रेमाचा त्याग करावा लागेल? काय होईल तुळजाच्या लग्न मंडपात?