पुढारी ऑनलाईन डेस्क - एकता आर कपूर आणि वरुण यांनी अंजिनी धवनची प्रेक्षकांशी ओळख करून देऊन तिच्या नव्या चित्रपटासाठी ग्रीन सिग्नल दिला. जो चित्रपट या वर्षातील सर्वात मोठे कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट ठरणार आहे. ट्रेलरने कथेची एक झलक दिली असून 'हर जनरेशन कुछ कहते है' असा खास संदेश यातून दिला आहे.
बालाजी टेलिफिल्म्स आणि महावीर जैन प्रस्तुत बिन्नी अँड फॅमिली शशांक खेतान आणि मृघदीप सिंग लांबा यांच्या संयुक्त विद्यमाने संजय त्रिपाठी दिग्दर्शित आहे. महावीर जैन फिल्म्स निर्मित आणि शिखा के आल्हुवालिया यांच्यासह वेव्हबँड प्रॉडक्शनचे ए झुनझुनवाला यांच्या सहकार्याने होणार आहे.
चित्रपटाबद्दल बोलताना महावीर जैन म्हणाले, "आपल्या सर्वांसाठी हा चित्रपट एक परिपूर्ण अनुभव आहे आणि प्रेक्षकांना या हृदयस्पर्शी कथेशी जोडलेले पाहून मला खूप आनंद झाला आहे. माझा विश्वास आहे 'बिनी आणि फॅमिली' केवळ मनोरंजनच करणार नाही तर कौटुंबिक बंधनांच्या सौंदर्याला महत्त्व देणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा देईल."
अंजिनी धवनचा हा पहिला चित्रपट असून याबद्दल बोलताना ती म्हणते, "बिन्नी अँड फॅमिली' माझ्यासाठी नेहमीच खास असेल. या भूमिकेने मला कौटुंबिक नातेसंबंधांच्या हृदयात डोकावण्याची गोष्ट दिली आणि हा अनुभव चित्रित करण्याची संधी दिली आहे. अशा अर्थपूर्ण प्रकल्पाचा भाग झाल्याबद्दल मी कायम कृतज्ञ आहे."
चित्रपटाबद्दल निर्मात्यांनी या पूर्वी सांगितलं होतं की, ‘बिन्नी आणि फॅमिली’ हा एक नवीन पिढीचा चित्रपट आहे जो आजच्या पिढीतील अंतर शोधतो. चित्रपटाच्या माध्यमातून प्रत्येक पिढीला एकमेकांच्या जवळ आणण्याचे त्यांचे ध्येय असल्याचे निर्मात्यांनी सांगितले. ट्रेलरसह एक नवीन पोस्टर देखील अनावरण करण्यात आलं आहे.
या चित्रपटात ‘हर जनरेशन कुछ कहता है’ हा प्रभावशाली संदेश देण्यात आला असून जो कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकणार आहे असं निर्माते वचन देतात.
चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे तस या चित्रपटाच्या कथेत काय आहे हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. वेव्हबँड प्रॉडक्शनचा झुनझुनवाला निर्मित 'बिन्नी अँड फॅमिली’ २० सप्टेंबर, २०२४ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.