

Bihar Election Khesari Lal Yadav updates
मुंबई - भोजपुरी अभिनेता खेसारी लाल यादव बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. ते छपरातून आरजेडीसाठी निवडणूक लढतील. ते आज अर्ज दाखल करणार असून सोशल मीडियाच्या माध्यामातून फॅन्सना माहिती दिलीय. भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव चित्रपटानंतर आता राजकारणात आपले नशीब आजमावणार आहेत. त्यांनी फॅन्सकडे प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.
खेसारी लाल यादवने गुरुवारी रात्री जाहीर केले होते की, ते निवडणूक सत्तेसाठी लढणार नाही तर ते जनतेचे पुत्र आहेत आणि राजकारणाला आपली जबाबदारी मानतात. खेसारी आता रिंगणात उतरणार म्हटल्यावर सगळीकडे चर्चेचा विषय सुरु आहे. आधी पवन सिंह निवडणूक लढण्यासाठी समोर आले होते. परंतु, खासगी कारणामुळे ते निवडणुकीच्या मैदानात उतरले नाहीत.
खेसारी म्हणाले, 'मी माझा अर्ज दाखल करत आहे आणि या औचित्याने तुमचा सर्वांचा आशीर्वाद, पाठिंबा माझ्यासाठी मोठे आहे. मनापासून आपल्या सर्वांना विनंती आहे की, नामांकना दिवशी या, तुमच्या मुलाला आणि भावाला आशीर्वाद द्या. आम्ही तुमचा हक्क आणि सम्मानाची लढाई आणखी दृढपणे लढू शकू.'
भोजपुरी इंडस्ट्रीत खेसारी लाल यादव यांचे फॅन फॉलोईंग खूप अधिक आहेत. सोशल मीडियावर ६.५ मिलियनच्या जवळपास फॉलोअर्स आहेत. त्यांचा अभिनय आणि गाण्याचे लोक वेडे आहेत. खेसारी जेव्हा मैदानात उतरतील, तेव्हा राजकीय वर्तुळात खूप चर्चा रंगणार आहे. याआधी मनोज तिवारी, रवि किशन यासारखे स्टार्सनी राजकारणात आपले नशीब आजमावले आहे. ज्यामध्ये त्यांना यशही मिळाले आहे. आता खेसारी लाल यादव यांचे नशीब किती चमकते, हे पाहणं रंजक ठरेल.