Kyunki Saas Bhi Kabhi: क्यों की सास भी कभी.. लवकरच घेणार निरोप? हे आहे त्यामागचे कारण
सध्या टीआरपीमध्ये वरचे स्थान कायम असलेल्या क्यों की सास भी कभी बहू थी या मालिकेचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अगदी गेले काही महिने टीआरपीमध्ये
पण या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सोशल मिडियावर एक पोस्ट व्हायरल होते आहे. ज्यामध्ये 'क्यों की सास भी कभी बहू थी' ही मालिका बंद होणार असल्याचा दावा केला जात आहे. मालिकेच्या एका फॅन पेजवर याबाबत पोस्ट शेयर केली आहे. (Latest Entertainment News)
कधी घेणार हा शो निरोप?
हा शो जानेवारीमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
हा शो बंद करण्याचे काय आहे कारण?
जानेवारीमध्ये क्यों की सास भी कभी बहू थी या मालिकेचे 200 भाग पूर्ण होणार आहेत. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच बोलले जात होते की या मालिकेचे 200 भागच प्रसारित होणार आहे. त्याचवेळी एकता कपूरने सांगितले होते की जर मालिकेने चांगली लोकप्रियता मिळवली तर पुढील भाग वाढवले जाईल.
पण एकताला अपेक्षित यश या मालिकेला अजूनही मिळाले नाही. त्यामुळे तिने ही मालिका आणखी न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
फॅन्स मात्र झाले चिंतित
ही बातमी समोर येताच क्यों की सास.. चे फॅन्स मात्र चिंतीत झाले आहेत. अर्थात मेकर्सने मात्र यावर कोणतीही रिएक्शन दिलेली नाही. पण या मालिकेच्या बंद होण्याच्या बातमीबाबत अनेक उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत. अनेकजण म्हणत आहेत ताणण्यापेक्षा योग्यवेळी निरोप घेणे कधीही योग्य आहे.
