Kyunki Kahaani crossover: टीव्हीच्या दोन महाराण्या एकत्र ! तुलसी आणि पार्वती दिसणार क्यों की सास भी.. च्या आगामी एपिसोडमध्ये एकत्र

'क्यों की सास भी कभी बहू थी' आणि 'कहानी घर घर की' या मालिका अनेकांच्या पसंतीस उतरली होती
Entertainment
पार्वती आणि तुलसी एकत्र Pudhari
Published on
Updated on

टेलिव्हिजनविश्वात एक काळ असा होता की, ज्यावेळी एकता कपूरच्या मालिका प्राइम टाइमवर राज्य करत होत्या. त्या दोन मालिकांपैकी एक 'क्यों की सास भी कभी बहू थी' आणि 'कहानी घर घर की' या मालिका अनेकांच्या पसंतीस उतरली होती. आता यापैकी क्यों की... चा दूसरा सीझन येऊ घातला आहे. दर आठवड्याला क्यों की च्या टीआरपीची टक्कर अनुपमाशी होत असते. त्यामुळे क्यों की च्या मेकर्सना दरवेळी मालिकेत एक नवीन ट्विस्ट आणला आहे. (Latest Entertainment News)

क्यों की च्या मालिकेत येणार नवे पाहुणे..

असे बोलले जात आहे की कहानी घर घर की ची पार्वती म्हणजे साक्षी तंवर आणि ओम म्हणजे किरण करमरकर हे या सीझनमध्ये दिसणार आहेत. मिहिर आणि तुलसी यांना पुन्हा एकत्र भेटवण्यासाठी क्यों की..च्या एपिसोडमध्ये पार्वती आणि ओम येणार आहेत.

याचा प्रोमोही समोर आला आहे. फॅन्सही तुलसी आणि पार्वतीला एकत्र पाहण्यासाठी आतुर आहेत.

Entertainment
Malaika Arora new item song : तिशीतल्या रश्मिकावर भारी पडली पन्नाशीतील मलाइका; हटके डान्सने केले सगळ्यांना घायाळ

काय आहे सध्या क्यों कीचा टीआरपी ?

क्यों की सास भी कभी बहू थीच्या दुसऱ्या सीझनला चांगलीच लोकप्रियता मिळते आहे. या शोचा टीआरपी चार्ट दुसऱ्या स्थानावर कायम आहे. आता मेकर्स या मालिकेला नंबर वनला आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सध्या टीआरपीवर नंबर वन असलेल्या अनुपमाला टक्कर देण्यासाठी क्यों कीच्या मेकर्सनी कंबर कसली आहे.

Entertainment
MTV Music Channels Closing: एका युगाची अखेर ! एम टी व्हीने बंद केले म्युझिक चॅनेल; आले धक्कादायक कारण समोर

नेटीझन्सची उत्सुकता शिगेला

नेटीझन्स म्हणाले, ‘ खूपच मनाला स्पर्श करणारे ! तुलसी आणि पार्वती भाभी टेलिव्हीजनच्या दोन सुपरस्टार सूना एकत्र दिसणार.’ दुसरा म्हणतो, ‘स्टार प्लसचे सगळ्यात लाडक्या व्यक्तिरेखा परत आल्या आहेत.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news