

‘क्युँकी सास भी कभी बहू थी 2’ मध्ये लवकरच मोठा लीप येणार असून या लीपनंतर तुलसी आणि मिहिरचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. कुटुंबातील नवीन परिस्थिती, गैरसमज आणि वेगवेगळ्या प्राधान्यांमुळे दोघे वेगळ्या वाटांवर निघतील अशी कथा समोर येत आहे.
Tulsi and Mihir different ways leap year in the serial
प्रचंड लोकप्रियतेनंतर एकेकाळी टीआरपीचे रेकॉर्ड मोडणारी ‘क्युँकी सास भी कभी बहू थी’ मालिकेच्या दुसरा सीझनमध्ये ट्विस्ट आला आहे. दुसऱ्या सीझनमध्ये नवीन ट्विस्टसह प्रेक्षकांचे लक्ष पुन्हा वळवण्याच्या तयारीत निर्माती आहे. निर्माती एकता कपूरने ‘क्युँकी सास भी कभी बहू थी २’ ला आधुनिक फॉरमॅटमध्ये सादर केलं असलं, तरी कथेचा इमोशनल प्लॉट कायम ठेवला आहे. आता या मालिकेमध्ये मोठा लीप येणार असल्याची पुष्टी झाली असून, त्यानंतर कथा पूर्णपणे बदलणार आहे.
स्टार प्लसवरील क्युँकी सास भी कभी बहू थी मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळेल. आता याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून राहिलीय. आता शोमध्ये तब्बल सहा वर्षांचा लीप येणार असून पुन्हा नवी कथा वळण घेतेय. या संदर्भातील नवा प्रोमो व्हायरल झाला आहे. या लिपमुळे मालिकेचं कथानक रंजक वळणावर जाणार आहे.
नव्या प्रमोमध्ये काय?
नव्या प्रमोमध्ये तुलसी एका साध्या चाळीत राहताना दिसते आणि ती प्रार्थना करत शांत, साधं आयुष्य जगताना दिसते. अंगद आणि त्याची पत्नी वृंदासोबत आहेत. तिच्या मनातील वेदना स्पष्ट जाणवतात. मिहिरचा फोटो पाहताच तिच्या मनात अतूट आठवणी जाग्या होतात. मिहिर तिच्यापासून इतका दूर कसा गेला याचा प्रश्न तिच्या मनात उमटताना दिसतोय.
दुसरीकडे बाजूला मिहिर विराणी हाऊसमध्ये प्रवेश करताना दिसतो आणि एक कडू सत्य व्यक्त करतो. तो तुलसीच्या रोपट्याला पाणी घालताना दाखवला आहे. रिपोर्टनुसार, मालिकेत काही नवीन पात्रांचीही एन्ट्री होणार आहे. तुलसी आणि मिहिरच्या मुलांच्या आयुष्याभोवती कथानक पुढे सरकणार आहे.
हा प्रोमो पाहिल्यानंतर तुलसी पुन्हा एकदा विराणी परिवारात परत येईल का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडेल. ही कहाणी रोज रात्री साडे दहा वाजता पाहता येणार आहे.