Kshama Deshpande : ‘जोगेश्वरीचा पती भैरवनाथचा तो सीन करताना माझे डोळे पाणावले’

Kshama Deshpande
Kshama Deshpande

पुढारी ऑनलाईन डेस्क : जोगेश्वरीचा पती भैरवनाथ मालिकेत जोगेश्वरी देवीची व्यक्तिरेखा क्षमा देशपांडे हिने साकारली आहे. यासाठी ती स्वतःला भाग्यवान मानते. हा प्रवास तिच्यासाठी एक भावनिक आणि ज्ञानवर्धक प्रवास ठरत आहे. (Kshama Deshpande ) प्रत्येक दिवशी ती जोगेश्वरी देवीबद्दल अधिक माहिती जाणून घेते आणि त्यातून नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करते. ही भूमिका साकारताना तिला काही नवीन आव्हानांना सामोरे जावे लागले आणि त्यातून मला एक अभिनेत्री म्हणून खूप काही शिकण्याची आणि स्वतःला विकसित करण्याची संधी मिळाली, असे क्षमा देशपांडे सांगते. (Kshama Deshpande)

संबंधित बातम्या –

जोगेश्वरी देवीची भूमिका साकारत असताना जोगेश्वरीला तिच्या आई आणि वडिलांची आठवण येत असते. त्या दोन दृश्यांमधील एक दृश्य असे होते की, जिथे जोगेश्वरी तिच्या आई आणि वडिलांना एक पत्र पाठवते, आणि तो सीन सादर करत असताना क्षमाचे डोळे पाणावले. कारण त्या क्षणी क्षमाला घरची आणि कुटुंबीयांची आठवण येऊ लागली. तो सीन सादर केल्या नंतर तिने लगेचच आईशी संपर्क साधला आणि तिच्या जवळ भावना व्यक्त केल्या. दुसऱ्या दृश्यात जोगेश्वरीला तिचे बालपणीचे दिवस आणि आई-वडील आठवत असताना तिला त्या क्षणी तिच्या वडिलांची आठवण येते. हादेखील एक असा सीन होता, ज्यामध्ये ती खूप भावूक झाली. कारण काही वर्षांपूर्वी तिने वडिलांना गमावले आणि तिला आयुष्यातील प्रत्येक क्षणाला त्यांची खूप आठवण येते.

कॅमेराच्या मागे, हेअर- मेकअप टीमसह, लग्नाच्या सिक्वेन्समध्ये सर्व महिला कलाकारांनी अगदी प्रेमानी आणि उत्साहात तयारी केली, जसं की ते लग्न खरे आहे. आणखी एक सर्वात आनंददायी क्षण होता, जेव्हा जवळच्या भागातील मुले सेटवर आली आणि त्यांनी जोगेश्वरी देवीबद्दलचे त्यांचे प्रेम व्यक्त केले.

क्षमा म्हणते, आमच्या सेटवर साताऱ्यातील एक कुटुंब आले आणि आम्ही त्यांना भेटताच त्यांनी अक्षरशः माझ्या चरणांना स्पर्श केला आणि 'तू आमची देवी आहेस आणि आम्ही तुझा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत' असे ते म्हणू लागले. मी भारावून गेले आणि त्या क्षणी माझे डोळे पाणावले.

जोगेश्वरीचे अनेक गुण मी माझ्या खासगी जीवनातही आत्मसात केले आहेत. जोगेश्वरी हि तिच्या विचारांवर आणि निर्णयांवर ठाम असते. तिचा एक वेगळा दृष्टिकोन आहे आणि ती तिच्या स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेबद्दल संरक्षणात्मक आहे. तिच्या अशा काही गुणांमुळे मला एक शांत निर्णय घेणारी व्यक्ती बनण्यास मदत झाली आहे. शोमधील काही कलाकारांनी आणि मी काही दिवसांपूर्वी खरसुंडीला भेट दिली जिथे कालभैरव देवता यांचे ४५० वर्ष जुने ऐतिहासिक मंदिर प्रसिद्ध आहे. त्या मंदिरात श्रीभैरवनाथ आणि जोगेश्वरी देवीचे काही भक्तांशी आमची भेट झाली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news