Hrithik Roshan Birthday : हृतिकचं पहिलं मानधन १०० रु. आता १०० कोटींचा आलिशान बंगला अन्…

Hrithik Roshan Birthday
Hrithik Roshan Birthday

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा हँडसम हंक ऋतिक रोशन आज त्याचा ५० वा वाढदिवस ( Hrithik Roshan Birthday ) मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. हृतिकच्या हटके डान्स मूव्हज् आणि अभिनयाचे अनेक लोक अगदी वेडे झाले आहेत. २००० साली 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून ऋतिकने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आणि चित्रपटाने सर्वाधिक पुरस्कार मिळवण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. 'कहो ना प्यार है' या चित्रपटाच्या यशानंतर त्याने 'सुपर ३०' आणि 'वॉर', सारखे हिट चित्रपट दिले आहेत. तर आता त्याचा आगामी 'फायटर' हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. दरम्यान ऋतिकच्या वाढदिवसानिमित्ताने त्याची एकूण संपत्तीची माहिती जाणून घेऊयात.

संबंधित बातम्या 

हृतिकने त्याच्या अभिनय कारकिर्दीला अगदी लहानपणापासून म्हणजे, वयाच्या ७ व्या वर्षीच 'आशा' चित्रपटात डान्सने सुरूवात केली होती. यासाठी त्याला काळात एकूण १०० रुपये मानधन मिळाले होतं. त्यानंतर बालकलाकार म्हणून त्यांची अभिनयातील करिअरला सुरूवात झाली. हृतिकने वडील राकेश रोशन यांचे सहाय्यक म्हणूनही काम केलं आहे. त्यानंतर तो हळूहळू यशाच्या शिखरावर पोहोचत गेला. आणि सर्वाधिक फि घेणार्‍या अभिनेत्यांच्या यादीत हृतिकचे नावाचा समावेश झाला.

रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, हृतिक एकूण ३७० दशलक्ष डॉलर्सच्या संपत्तीचा मालक आहे. म्हणजे, त्याच्याकडे भारतानुसार २७०० कोटी रुपयांची संपत्ती आहे. याशिवाय त्याच्याकडे आलिशान बंगला आणि आलिशान कारदेखील आहेत. तसेच त्याच्याकडे महागड्या घड्याळांचा संग्रह आहे. हृतिकला लक्झरी गाड्यांचा शौक आहे. ( Hrithik Roshan Birthday )

हृतिक रोशन एका चित्रपटासाठी ३५ कोटी रुपये मानधन घेतो. याशिवाय तो कोणत्याही एका उत्पादनाच्या जाहिरातीसाठी ८ ते १५ कोटी रुपये मानधन घेतो. मात्र, त्याची सर्वाधिक कमाई चित्रपटांमधून होते. वर्षभरात त्याचे फक्त एक-दोनच चित्रपट प्रदर्शित होतात. अभिनेता असण्यासोबत हृतिक एक मोठा उद्योगपतीही आहे. याशिवाय हृतिक उद्योगपती असून ब्रँड एंडोर्समेंटमधून कमाई करतो. मुंबई आणि दिल्लीत त्यांची अनेक रेस्टॉरंट आहेत. त्यामुळे त्यांची वार्षिक कमाई अंदाजे, १८० कोटी रुपये होत आहे.

हृतिक रोशनची मालमत्ता

बॉलिवूडचा मोस्ट स्टायलिश अभिनेता हृतिक रोशनकडे १०० कोटींहून अधिक किमतीचे आलिशान बंगला आहे. एवढेच नाही तर हृतिकचे दोन अपार्टमेंट आणि जुहू-वर्सोवा लिंक रोडवर एक फ्लॅटही आहे. हा फ्लॅट त्याने भाड्याने दिला आहे. मुंबईशिवाय दिल्ली आणि बंगळुरूच्या पॉश भागात हृतिकची कोट्यावधीची मालमत्ता आहे.

हृतिकचे कार कलेक्शन

इतकंच नाही तर इतर अभिनेत्यांप्रमाणेच हृतिक रोशनलाही लग्झरी कारचा शौक आहे. त्याच्या कार कलेक्शनबद्दल सांगायचे तर, अभिनेत्याकडे फेरारी, व्होल्वो, ऑडी, मर्सिडीज आणि पोर्श सारख्या आलिशान कार आहेत. ज्याची किंमत २५ कोटी रुपयांहून अधिक आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news