

‘उडने की आशा’ फेम अभिनेता कृप कपूरचा ११ वर्षांनंतर संसार तुटल्याची बातमी समोर आली आहे. घटस्फोटाची माहिती बाहेर येताच चाहत्यांना मोठा धक्का बसला असून, अभिनेता सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
टेलिव्हिजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘उडने की आशा’ या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात ओळख निर्माण करणारा अभिनेता कृप कपूर याचा ११ वर्षांचा संसार तुटल्याची माहिती समोर आली आहे.
टीव्हीचा हँडसम हंक कृप कपूर सूरीच्या खासगी जीवनाविषयी एक धक्कादायक बातमी समोर येतेय. लोकप्रिय मालिका 'उडने की आशा'मधून त्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. या मालिकेत त्याने ट्रॅफिक पोलिसाची भूमिका साकारली होती. आता तो वैयक्तिक आयुष्यातील एका घटनेवरून चर्चेत आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कृप कपूर आणि त्याची पत्नी गेल्या काही काळापासून वेगळे राहत होते. वैयक्तिक मतभेद आणि समजूतदारपणाचा अभाव हे विभक्त होण्यामागचे प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. दोघांनीही परस्पर संमतीने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे, मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
११ वर्षांनंतर संसार मोडल्याच्या वृत्ताला खुद्द अभिनेत्याने पुष्टी दिली आहे. दरम्यान, त्याची पत्नी सिमरनच्य़ा सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाल्यानंतर घटस्फोटाच्या अफवा उडाल्या होत्या. मागील वर्षी दोघे विभक्त राहत असल्याचे समोर आले. पण कृपने स्पष्ट नकार दिला होता. आता एका बातचीतमध्ये कृपने सांगितले की, होय, आम्ही वेगळे झालो आहोत.
कृप कपूर सूरी-सिमरन कौर सूरी यांचे २०१४ मध्ये लग्न झाले होते. २०२० मध्ये त्यांना कन्यारत्न झाले. आता ११ वर्षानंतर ते कायदेशीररित्या वेगळे झाले आहेत.
२०२४ च्या घटस्फोटाच्या वृत्तावर तो भडकला होता. त्याने सोशल मीडियावर लिहिले होते, "जेव्हा देखील मी काही शेअर करतो, ती वेदना फक्त माझ्या पत्नीपर्यंत मर्यादित का? प्रत्येक कपलमध्ये चढ-उतार येतात. परंतु, आम्ही सोबत आहोत."
पण आता खरचं दोघे वेगळे झाल्याने त्याच्या घटस्फोटाची बातमी समोर येताच फॅन्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताहेत.